अथर्व गावकरमुळे महाराष्ट्राचा विजय, कुमार गट राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा

डॉ. बी.सी.रॉय ट्रॉफी हिरो कुमार राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत गोलरक्षक अथर्व गांवकरच्या जोरदार कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने कर्नाटकचा 3-1 असा पराभव करत विजयी सलामी दिली. अथर्वने आपल्या अभेद्य अशा गोलरक्षणाच्या जोरावर कर्नाटकचे 9 ते 10 गोलहल्ले परतावून लावले. या कामगिरीसाठी अथर्वला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

सामन्याच्या सहाव्या मिनिटालाच कर्नाटकच्या ख्रिस जोसेफने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मग सामन्याच्या 45 व्या मिनिटाला महाराष्ट्राला नाईल गोघावालाने बरोबरी साधून दिली. मग पुन्हा 54 व्या मिनिटाला नाईलने आणखी एक गोल करत महाराष्ट्राला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. 69व्या मिनिटाला पार्थ तालकोकूलने महाराष्ट्रासाठी तिसरा गोल केला आणि ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखत विजयी सलामी दिली.

आता महाराष्ट्राचा गटातील दुसरा सामना 7 सप्टेंबरला मिझोरामविरुद्ध आणि तिसरा सामना 9 सप्टेंबरला झारखंडविरुद्ध होणार आहे. महाराष्ट्राचा संघ ‘ए’ गटात असून मिझोराम, कर्नाटक, झारखंड आणि महाराष्ट्र या चार संघांचा या गटात समावेश आहे