ऑडी इंडियाच्या विक्रीमध्ये 33 टक्क्यांनी वाढ

ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्‍ये 7,027 युनिट्सची विक्री केली आहे, ज्‍यामध्‍ये एकूण 33 टक्‍के वाढ झाली आहे. ब्रॅण्‍डने 2024 च्‍या पहिल्‍या तिमाहीत गेल्‍या वर्षीच्‍या याच कालावधीच्‍या तुलनेत प्रामुख्‍याने पुरवठा साखळीमध्‍ये अडथळे असताना देखील विक्रीसंदर्भात आव्‍हानांचा सामना करत 1,046 युनिट्सची विक्री केली आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, ”आम्‍हाला वैविध्‍यपूर्ण पोर्टफोलिओमुळे आर्थिक वर्ष 2023-24 मध्‍ये 33 टक्‍क्‍यांची प्रबळ वाढ दिसण्‍यात आली आहे. आमच्‍या उत्‍पादन पोर्टफोलिओला प्रबळ मागणी मिळत आहे, जेथे आम्‍ही पुरवठ्यासंदर्भातील आव्‍हानांवर मात करण्‍यासाठी सज्‍ज आहोत. 2023 मधील विक्रमी विक्रीच्‍या आधारावर लक्‍झरी बाजारपेठेत सुरू असलेल्‍या विकासासह आम्‍हाला 2024 मध्‍ये 50,000 कार्सच्‍या विक्रीचा टप्‍पा पार करण्‍याच्‍या उद्योगाच्‍या क्षमतेबाबत विश्वास आहे.”

ऑडी अप्रूव्‍ह्ड: प्‍लस पूर्व-मालकीच्‍या कार व्‍यवसायाने आर्थिक वर्ष 2023-24 मध्‍ये 50 टक्‍क्‍यांची वाढ केली. जानेवारी ते मार्च 2024 कालावधीदरम्‍यान ऑडी अप्रूव्‍ह्ड: प्‍लसने 25 टक्‍यांच्‍या प्रबळ वाढीची नोंद केली. सध्‍या देशभरातील सर्व प्रमुख ठिकाणी 26 ऑडी अप्रूव्‍ह्ड: प्‍लस सुविधांसह कार्यरत असलेला ब्रॅण्‍ड विस्‍तार करत राहिल आणि यंदा चार अधिक पूर्व-मालकीच्‍या कार सुविधांची भर करेल.

ऑडी इंडिया उत्‍पादन पोर्टफोलिओ: ऑडी ए4, ऑडी ए6, ऑडी ए8 एल, ऑडी क्‍यू3, ऑडी क्‍यू3 स्‍पोर्टबॅक, ऑडी क्‍यू5, ऑडी क्यू7, ऑडी क्‍यू8, ऑडी एस5 स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस5 स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस क्‍यू8, ऑडी क्‍यू8 50 ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू8 55 ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू8 स्‍पोर्टबॅक 50 ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू8 स्‍पोर्टबॅक 55 ई-ट्रॉन, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी.