पोषक तत्त्वांचे भांडार, सौंदर्यवाढीसाठी उपयुक्त ‘हा’ पदार्थ, फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल

आयर्न, मिनरल, कॅल्शियम, अमिनो अॅसिड, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वे खजुरात भरपूर प्रमाणात असतात. खजुरात ग्लुकोज आणि फ्रक्टोजचे भांडार असते. यामुळे मधुमेहावर खजूर गुणकारी समजला जातो. शिवाय खजुरात कोलेस्ट्रॉल नसल्याने ह्रदयाशी संबंधित विकार दूर होण्यासही मदत होते. खजूराचा आहारात समावेश केला, तर शरीरासाठी किती फायदेशीर ठरू शकते, जाणून घेऊया.

खजूर वाळवला की, त्यापासून खारीक तयार होते. सुक्या अंजीरात किंवा मनुकांमध्ये अंजीरपेक्षा किंवा द्राक्षांपेक्षा जास्त कॅलरी असतात. त्याचप्रमाणे खजूर किंवा खारकेतसुद्धा कॅलरीचे प्रमाण जास्त असते. 100ग्रॅम खजुरामधून 277 कॅलरीज मिळतात. यामुळे लगेचच एनर्जी हवी असेल, तर खजूर हा एक चांगला पर्याय आहे. खजुरामध्ये कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात व प्रोटीन त्यामानाने कमी प्रमाणात असतात. खजुरामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्ससुद्धा जास्त प्रमाणात आढळतात. पोटॅशिअम, मँग्नेशिअम, कॉपर, मँगनीज, आयर्न हे खजुरामध्ये जास्त प्रमाणात आढळणारे मिनरल्स (खनिजे) तर व्हिटॅमिन बी-6 हे सुद्धा खजुरामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात.

फायबरसाठी गुणकारी…
पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी आहारात फायबरचे प्रमाण जास्त असणे गरजेचे असते. खजुरामध्ये फायबर जास्त प्रमाणात आढळतात म्हणून आपल्या आहारातले फायबर वाढवण्यासाठी खजुराचा जास्तीतजास्त उपयोग केला जाऊ शकतो. आहारात फायबरचे प्रमाण जास्त असले, तर ते पचनक्रियेसाठी फायदेशीर असते आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेच्या तक्रारी होतात. फायबर जास्त असलेले पदार्थ आहारात असले तर पोट भरल्याची भावनासुद्धा लवकर होते, ज्यामुळे वजन आटोक्यात ठेवायला फायदा होतो. फायबरमुळे आपला पचनक्रियेचा वेग कमी होतो आणि जेवल्या जेवल्या रक्तातील साखर वाढत नाही, म्हणजेच खजूर हे लो ग्लायसेमिक इंडेक्स या प्रकारात मोडतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदा होतो. म्हणजेच कॅलरी जास्त असल्या तरी मधुमेह असणाऱ्या लोकांना खजूर उपयुक्त ठरतो.

अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त
खजुरामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे काही रोगांचा असलेला संभाव्य धोका टळतो. अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील पेशींचे फ्री रॅडिकल्स पासून संरक्षण करतात. फ्री रॅडिकल्स हे आपल्या शरीरातल्या निरोगी पेशींना धोका पोहोचवून काही आजार निर्माण करू शकतात. असे होऊ नये म्हणून आहारात अँटिऑक्सिडंट्स जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. यासाठी खजूर हा एक उत्तम पर्याय आहे. इतर ड्रायफ्रुट्सच्या तुलनेत खजूरामध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट आढळतात. फ्लावनॉइड या खजुरामध्ये जास्त प्रमाणात आढळणाऱ्या अँटिऑक्सिडंटमुळे काही आजारांचा जसे की डायबेटीस, अल्झायमर्स आणि काही प्रकारच्या कॅन्सरचासुद्धा धोका कमी होतो. खजुरात मिळणारे कॅरेटोनॉइड हे अँटिऑक्सिडंट आपल्या ह्रदयाच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. खजुरात अजून एक महत्त्वाचे अँटिऑक्सिडंट जास्त प्रमाणात आढळते, ते म्हणजे ‘फिनॉलिक ऍसिड’, जे आपल्याला ह्रदयविकारांपासून दूर ठेवते. या अँटिऑक्सिडंट्समुळे खजूर आपल्या मेंदूच्या विकासासाठी आणि आरोग्यासाठीसुद्धा फायदेशीर असतो आणि खजुराच्या नियमित सेवनाने अल्झायमर्स या आजाराचा धोका कमी होतो. अल्झायमर हा वय वाढल्यानंतर होणारा आजार असल्याने, खजुराच्या नियमितपणे सेवनाचे दूरगामी परिणाम हा आपल्या निरामय आयुष्यावर होणार आहे, हे नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे.

प्रसूतीसाठी फायदेशीर…
गरोदरपणात शेवटच्या काही आठवड्यात खजूर खाल्ल्याने नैसर्गिक रित्या प्रसूती कळा सुरु होतात. ऑक्सिटॉसीन या हॉर्मोनमुळे डिलिव्हरीच्या आधी कळा सुरु होतात. खजुरात असणारे कंपाउंड्स हे ऑक्सिटोसिनसारखाच परिणाम शरीरावर करतात. याशिवाय खजुरात जास्त प्रमाणात आढळणाऱ्या टॅनिन्समुळे गर्भपिशवीचे आकुंचन होण्यासाठी मदत होते. यामुळे प्रसूती वेदनेचा काळ कमी होतो. खजुरामधल्या कॅलरीजमुळे डिलिव्हरीच्या वेळेस अशक्तपणा सुद्धा जाणवत नाही.

साखरेऐवजी वापरण्यासाठी चांगला पर्याय
खजुरामध्ये फळांमध्ये असणारी फ्रक्टोज साखर असते. यामुळेच खजुराला गोड चव…

साखरेऐवजी वापरण्यासाठी चांगला पर्याय
खजुरामध्ये फळांमध्ये असणारी फ्रकटोज साखर असते. यामुळेच खजुराला गोड चव असते. मधुमेहींसाठी पदार्थांत गोडवा आणण्यासाठी साखरेला पर्याय म्हणून खजुराचा वापर होऊ शकतो.यासाठी खजुराची मिक्सरमधून पेस्ट तयार करून घेऊन ती खिरींसारख्या गोड पदार्थांमध्ये साखरेच्या ऐवजी घालू शकतो. यामुळे दुहेरी फायदा होईल. आहारातील साखरेचे प्रमाण कमी होऊन मधुमेह नियंत्रणात ठेवता येईल, वजन सुद्धा आटोक्यात राहील आणि खजुरामध्ये असणाऱ्या पोषक तत्त्वांचा आणि अँटिऑक्सिडंट्सचा फायदासुद्धा होईल.

हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
खजुरामध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस ही महत्वाची खनिजे जास्त प्रमाणात आढळतात जी आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. म्हणूनच खजूर आपल्या आहारात घेतल्याने ऑस्टिओपोरोसिस सारख्या हाडाच्या विकारापासून बचाव होतो.

रक्तदाब कमी करण्यास फायदेशीर
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या शरीरात सोडियम, पोटॅशिअमचा समतोल असणे गरजेचे आहे. सोडियम हे रक्तदाब वाढवण्यास कारणीभूत असते, तर पोटॅशिअम तर कमी करण्यासाठी. खजुरामध्ये असणाऱ्या पोटॅशिअम या खनिजामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यासाठी मदत होते.

पुरुष वंध्यत्वावर गुणकारी
खजुरामध्ये जास्त प्रमाणात आढळणाऱ्या फ्लावनॉइड आणि इस्ट्राडिओल या घटकांमुळे विर्यातील शुक्राणूंची संख्या वाढते ज्याचा जननक्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो.

त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास उपयुक्त
खजुरात जास्त प्रमाणात असणाऱ्या व्हिटॅमिन ‘सी’ चा परिणाम म्हणजे त्वचेशी संबंधित तक्रारी दूर होतात. तर जास्त प्रमाणात आढळणाऱ्या व्हिटॅमिन बी 5 मुळे केस गळती कमी होते.

अशक्तपणावर सोपा उपाय
रक्तातील लाल पेशी आणि हिमोग्लोबिनच्या कमरतेमुळे ऍनेमिया होतो. शरीरात आयर्नचे प्रमाण वाढवणे हा ऍनेमियावरचा उपाय आहे. यासाठी खजूर खाल्ल्यास फायदा होतो. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आयर्नच्या गोळ्या घेता येतात किंवा काही घरगुती उपायांनी सुद्धा ते वाढवता येते. आहारात आयर्नचे जास्त प्रमाणात घेतल्याने फायदा होऊ शकतो. खजुरामध्ये आयर्न जास्त प्रमाणात असते आणि म्हणूनच त्याच्या नियमित सेवनाने हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यासाठी मदत होते. खजूराचे आपल्या आरोग्यासाठी किती विविध फायदे आहेत हे आपण पाहिले.

खजुराचा वापर आहारात कसा करावा?
– नाश्त्याबरोबर दोन खजूर खाऊ शकतो.
– संध्याकाळच्या वेळेला भूक लागते तेव्हा फास्ट फूड ला पर्याय म्हणून हेल्दी स्नॅक्स खाऊ शकतो. थोडे दाणे, दोन खजूर, मनुका, बदाम, अक्रोड असे सुकामेवा आणि एखादे ताजे फळ.
– साखरेच्या ऐवजी गोड पदार्थात जसे की खिरीत किंवा लाडवांमध्ये वापरता येते.
– चिंचेच्या चटणीत गुळाबरोबर गोडव्यासाठी वापरता येतो.