चौकशीला हजर राहत नसल्याने अरविंद केजरीवालांविरोधात ईडीची न्यायालयात धाव

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीने पाठवलेले समन्स पाचव्यांदा धुडकावून लावले. ते चौकशीला ते हजर न राहिल्याने ईडीने त्यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीने दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात कलम 174 अंतर्गत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

ईडीने केजरीवाल यांना 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर, 3 व 17 जानेवारी आणि त्यानंतर आज 2 फेब्रुवारी असे तब्बल 5 समन्स जारी केले होते. परंतु सर्व समन्स केजरीवाल यांनी धुडकावून लावले. मी प्रचार करू नये म्हणून हा डाव टाकला जात असून ईडी आणि सीबीआयचा वापर इतर पक्षांच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजपकडून केला जात असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.