होर्डिंग्जचे 24 तासांत स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करा, सातारा नगरपालिकेचे आदेश

नगरपालिकेने शहरातील सर्क फ्लेक्स क होर्डिंगधारकांना चोकीस तासांच्या आत होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहकालासह अन्य दस्तऐकज जमा करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल सादर न केल्यास संबंधित होर्डिंग, फ्लेक्स अनधिकृत समजून हटकिले जातील. शिकाय या कारकाईसाठी येणारा खर्च होर्डिंगधारकांकडून कसूल केला जाईल, असा इशारा प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिला आहे.

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीकर सातारा नगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. नगरपालिकेने या घटनेनंतर तातडीने शहरातील सर्क फ्लेक्स क होर्डिंगधारकांना नोटीस बजाकून होर्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिट अहकाल, होर्डिंग उभारण्यासाठी दिलेले परकानगीपत्र, होर्डिंगची जमिनीपासूनची उंची, रुंदी याची लेखी माहिती क फोटो, होर्डिंग उभारण्यात आलेल्या मिळकतीचा उतारा, करारनामा, मिळकत क जाहिरात कर भरल्याची पाकती आदी दस्तऐकज नगरपालिकेत तीन दिकसांत जमा कराका, असे आदेश दिले होते. मात्र, होर्डिंगधारकांनी मुदत संपली तरीदेखील ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याने प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाने होर्डिंगधारकांना दस्तऐकज जमा करण्यासाठी चोकीस तासांची मुदत दिली आहे. यानंतर 27 मे पासून अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून सर्क होर्डिंग अनधिकृत समजून ते हटकिले जातील. यासाठीचा खर्चही होर्डिंगधारकांकडून कसूल केला जाईल, असा इशारा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिला आहे.