आई ती आईच…पाच वर्षाच्या मुलाला किडणीदान करत दिलं नवं जीवनदान

आई ती शेवटी आईच असते. तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. याची प्रचिती देणारी ही बातमी आहे. बिहारच्या एका मातेने आपल्या 5 वर्षाच्या मुलाचा जीव वाचविण्यासाठी किडणीदान करत त्याला नवं जीवनदान दिले आहे. सध्या दोघांचीही प्रकृती स्वस्थ आहे.

पाच वर्षीय ऋषभ अनेक दिवसांपासून क्रोनिक किडणीच्या आजाराने आणि हायपरटेन्शनने त्रस्त होता. तो डायलिसीससाठी एकॉर्ड रुग्णालयात उपचार घेत होता. तिथे त्याला डायलिसीससाठी चांगले वातावरण करुन दिले होते. ज्या तिथल्या नर्सिंग स्टाफसोबत तो लुडो आणि अन्य खेळ खेळत डायलिसीस करुन घ्यायचा. पण त्याला किडणी प्रत्यारोपणाची प्रचंड आवश्यकता होती. युरोलॉजिस्ट डॉ.सौरभ जोशी यांनी मुलाच्या आईला किडणी दान करण्याबाबत माहिती दिली. त्यावेळी त्या माऊलीने माझ्या मुलाला काही करुन वाचवा. माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्या मुलगा वाचणं गरजेचे आहे. माझ्या जीवाची मला पर्वा नाही अशा भावना व्यक्त केल्या. सुदैवाने त्याची चाचणी केली असता त्या  दाता म्हणून फिट होत्या आणि आरोग्य विभागाने समितीच्या परवानगीनंतर 5 वर्षाच्या मुलाचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.

बिहारच्या ग्रेटर फऱीदाबाद सेक्टर 86 येथील रुग्णालयात ही प्रत्यारोपणाची यशस्वी शस्रत्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर मुलगा आणि त्याची आई दोघंही सुखरुप आहेत. हे यशस्वी प्रत्यारोपण नेफ्रोलॉजी डिपार्टमेण्टच्या डॉ.जितेंद्र कुमार व यूरोलॉजिस्ट डॉ. सौरभ जोशी, डॉ. वरुण कटियार यांच्या टीमने केले.