हिंदुस्थानला पाच सुवर्ण

अंडर-20 आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या दुसऱया दिवशी हिंदुस्थानी खेळाडूंनी पाच सुवर्णांसह एकूण 13 पदकांची कमाई केली. भालाफेकमध्ये दिपांशूने हिंदुस्थानला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. तसेच रौप्यपदकही हिंदुस्थानच्याच रोहन यादवने मिळवले. हिंदुस्थानच्या या पदकविजेत्या कामगिरीमुळे पदकतालिकेत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. दुसऱया स्थानावर असलेल्या चीनने 3 सुवर्णांसह पाच पदके जिंकली आहेत.

पहिल्या दिवशी दीपांशूने 70.29 मीटर भालाफेक करून हिंदुस्थानला पहिले सुवर्ण मिळवून दिले होते. या स्पर्धेत यूपीचा रोहन यादव 70.23 गुणांसह दुसरा राहिला. उत्तर प्रदेशच्या प्रियांशूने पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत 3ः50.85 सेपंद वेळेसह रौप्यपदकाला गवसणी घातली. तर कतारच्या एटूलगाझीने सुवर्णपदक जिंकले. हृतिक राठीने थाळीफेकीत 52.23 मीटर फेक करून रौप्यवर आपले नाव कोरले.