Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’26 जुलै’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Wednesday, july 26, 2023)
आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. गुंतवणूक करताना घाईगडबड करू नका. घरात शांततापूर्ण वातावरण असेल. योग्य व्यक्तिशी अचूक संवाद साधाल. घरातील फुलदाणीत लाल रंगाची गुलाबाची फुले ठेवा. उगाच चिंता करण्यात वेळ वाया घालवू नका. छंद जोपासा.
शुभरंग : काळा

वृषभ (TAURUS – Wednesday, july 26, 2023)
कार्यालयातून लवकर घरी जाल. कुटुंबातील आनंद वाढेल. बदामी रंगाची चादर वापरा. पैसे व्यर्थ खर्च करू नका. इतरांच्या कामात नाक खुपसण्याची सवय टाळलेली बरी. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत सौजन्याने वागाल. आजचा दिवस उत्साहात घालवाल. आवडती गोष्ट करण्याची संधी मिळेल. समाजात तुमचे कौतुक होईल. बोलताना मधुरावाणीचा वापर करा.
शुभरंग : आकाशी

मिथुन (GEMINI – Wednesday, july 26, 2023)
पटकन रागवू नका. सूर्योदयाच्या वेळी सूर्यनमस्कार करा. व्यापारात नफा कमवाल. मोत्याच्या दागिन्यांची खरेदी कराविशी वाटण्याची शक्यता आहे. जुन्या आठवणीत रमाल. मनातील विचार मांडण्यास कचरू नका. सायंकाळी करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवाल. जुनी मैत्रिण भेटेल. मन प्रसन्न ठेवणारी कामे कराल.
शुभरंग : खाकी

कर्क (CANCER – Wednesday, july 26, 2023)
एखादी नवीन कला सहजपणे आत्मसात कराल. पैसे विनाकारण खर्च करू नका. नातेवाईक किंवा मित्रमंडळी अनपेक्षितपणे घरी येण्याची शक्यता आहे. जोडीदाराला वेळ देता येईल. नवीन कपड्यांची खरेदी कराल. खिशात हिरव्या रंगाचा रुमाल ठेवा. श्रीरामाचे दर्शन घ्या. सायंकाळी घरात रामरक्षा वाचा.
शुभरंग : पोपटी

सिंह (LEO – Wednesday, july 26, 2023)
आज करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवाल. कुटुंबातील ताणतणावांमुळे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. मानसिक त्रास दूर होण्यासाठी ध्यानधारणा करा. कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावा. देवाला फुले वाहा. सायंकाळी घरातील ज्येष्ठांसोबत बागेत फिरायला जाल. जोडीदारासोबत फिरायला जाल.
शुभरंग : गुलाबी

कन्या (VIRGO – Wednesday, july 26, 2023)
सकाळच्या कोवळ्या उन्हात चालायला जाल. कुटुंबातील ताणतणाव दूर होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रियकरावर शंका घेऊ नका. व्यवहार उत्तर करण्याचा प्रयत्न कराल. कामात एकाग्रता साधण्यासाठी गणपतीचा नामजप करा. गणपतीला एकवीस दुर्वा वाहा. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान कराल.
शुभरंग : मोरपिसी

तूळ (LIBRA- Wednesday, july 26, 2023)
घरात गंगाजल शिंपडा. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ खर्च कराल. प्रलंबित देणी दिल्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नवीन उपक्रम राबवाल. आवडते पुस्तक वाचण्यासाठी वेळ काढावा लागेल. प्रिय व्यक्तिकडून छान सरप्राईझ मिळेल. आशादायी राहा. वेळ पाळा. लाल रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : लाल

वृश्चिक ( SCORPIO – Wednesday, july 26, 2023)
आरोग्य चांगले राहिल. काळी छत्री आणि काळ्या बुटांचे दान करा. प्रिय व्यक्ती संपर्कात येईल. आजचा दिवस व्यस्त असेल. रिकाम्या वेळात आवडती कामे कराल. जोडीदारासोबत मनोरंजानाचे कार्यक्रम पाहण्यात व्यस्त राहाल. घराच्या परसात आवडते फुलझाड लावा. कुटुंबियांना वेळ द्याल. निसर्गरम्य ठिकाणी प्रवासाचा आनंद घ्याल.
शुभरंग : पांढरा

धनु (SAGITTARIUS – Wednesday, july 26, 2023)
ताणतणावापासून दूर राहाल. नाविन्यपूर्ण कल्पना सुचतील. कोणावरही जबरदस्ती करू नका. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल. मित्रमैत्रिणींसोबत आनंदात वेळ घालवाल. घरात धार्मिक कार्य पार पडण्याची शक्यता आहे. शंकराला अभिषेक घाला.
शुभरंग : निळा

मकर ( CAPRICORN – Wednesday, july 26, 2023)
गाईला ताजी पोळी खाऊ घाला. आरोग्य चांगले राहिल. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. घरातील गरजेचे सामान खरेदी कराल. कार्यालयातील कामे पूर्ण होतील. एखाद्या गोड आठवणीमुळे क्षुल्लक भांडण मिटून जाईल. जोडीदारासोबत कितीही भांडण झालं तरी जुने सुंदर दिवस आठवायला विसरू नका. वरिष्ठ कौतुक करतील.
शुभरंग : जांभळा

कुंभ (AQUARIUS – Wednesday, july 26, 2023)
प्रिय व्यक्तील चांदीचा हत्ती भेट द्या. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. कुटुंबियांसोबत सहभोजनाचा आनंद घ्याल. प्रवास आनंददायी असेल. अडलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. धाडसाने उचललेलं पाऊल लाभदायक असेल. कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका.
शुभरंग : मोरपिसी

मीन (PISCES – Wednesday, july 26, 2023)
सूर्यस्नान करा. अंघोळीच्या पाण्यात भिमसेनी कापराची पूड घाला. कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल होतील. घरातील वरिष्ठांचे घराबाहेर पडताना आशीर्वाद घ्या. निसर्गाचा आनंद घ्याल. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक आहे.
शुभरंग : आकाशी