Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’28 जुलै’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Friday, july 28, 2023)
मुंग्यांना साखर खाऊ घाला. आशावादी राहाल. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला आहे. नकळत झालेली चूक वेळच्या वेळी दुरुस्त करा. हातून धार्मिक कार्य घडेल. कार्यक्षेत्रात अडचणी येण्याची शक्यता आहे. जोडीदाराला लाल गुलाबाचे फूल द्या.
शुभरंग : नारिंगी

वृषभ (TAURUS – Friday, july 28, 2023)
घराती चांदीचे नाणे गंगाजलात बुडवून ठेवा. आजचा दिवस ऊर्जने भरलेला असेल. मुलांकडून चांगली बातमी कानी येईल. प्रवासात प्रिय व्यक्तिची भेट होईल. उगाचच वादविवादात पडू नका. व्यावसायिकांशी ओळख होण्याची शक्यता आहे. फुलझाडांची लागवड करा.
शुभरंग : हिरवा

मिथुन (GEMINI – Friday, july 28, 2023)
कास्यांचे भांडे गरजूला दान करा. कोणालाही आश्वासने देत बसू नका. आज ब्युटिपार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढाल. झोपण्याकरिता चटईचा वापर करा. गणपती अथर्वशीर्षाचे वाचन करा. अबोलीच्या फुलांचा गरजा केसात माळा.
शुभरंग : गुलाबी

कर्क (CANCER – Friday, july 28, 2023)
स्वत:लाच स्वत:बद्दल छान वाटावे, असा आजचा अद्भूत दिवस आहे. कुटुंबियांच्या कल्याणासाठी मेहनत कराल. जोडीदाराला समजून घ्यावे लागेल. मूड बिघडण्याची शक्यता आहे. आराध्यदेवतेचे दर्शन घ्या. मन लावून काम कराल. कोणाचाही मत्सर, द्वेष करू नका.
शुभरंग : पांढरा

सिंह (LEO – Friday, july 28, 2023)
तांब्याचा शिक्का किंवा तुकडा खिशात ठेवा. उगाचच आरोग्याची काळजी करू नका. संकटात मित्रांचा पाठिंबा मिळेल. नव्या योजनांमुळे उत्साहात वाढ होईल. कोणाविषयीही गैरसमज करून घेऊ नका. एकांतात वेळ घालावल.
शुभरंग : लाल

कन्या (VIRGO – Friday, july 28, 2023)
लहान मुलांसाठी वेळ काढा. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. अनुभवी व्यक्तिंचे मार्गदर्शन घ्याल. रखडलेली कामे पूर्ण कराल. वाहत्या पाण्यात चुरमुरे प्रवाहित करा. धार्मिक स्थळी भेट द्याल. कोणाचेही मन दुखवू नका.
शुभरंग : निळा

तूळ (TULA- Friday, july 28, 2023)
गरिबांना ब्लॅंकेट द्या. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. दररोज व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. कलेत रममाण व्हाल. दररोज एकाग्रता वाढीसाठी सरस्वती देवीचे स्तोत्र वाचा. भटकंती करण्याचा विचार मनात येण्याची शक्यता आहे.
शुभरंग : चॉकलेटी

वृश्चिक ( SCORPIO – Friday, july 28, 2023)
शंकराच्या देवळात अभिषेक करा. नवे छंद जोपासण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आरोग्याची काळजी घ्या. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. प्रेमात घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका. आयुष्यात काहीतरी इंटरेंस्टिंग घडावे, याची वाट पाहात असाल, तर ती वेळ आता जवळ आली आहे, याची खात्री बाळगा.
शुभरंग : केशरी

धनु (SAGITTARIUS – Friday, july 28, 2023)
घरात अनावश्यक सामान गोळा करून ठेवू नका. धार्मिक कार्याकरिता आजचा दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्ती रागावण्याची शक्यता आहे. तुमच्याकडील कौशल्याचा वापर करा. लोकं तुमचे कौतुक करतील. वाणसामानाची खरेदी करण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : नारिंगी

मकर ( CAPRICORN – Friday, july 28, 2023)
सूर्योदयाच्या वेळी सूर्य नमस्कार घाला. आज तुम्हाला नवीन आर्थिक योजनांबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे. नव्या कल्पना आणि योजना सुचतील. एकांतात वेळ घालवावासा वाटू लागेल. चिनीमातीच्या फुलदाणीत अष्टरची रंगीबेरंगी फुले ठेवा. कोणतेही औषध स्वत:च्या मनाने घेऊ नका.
शुभरंग : राखाडी

कुंभ (AQUARIUS – Friday, july 28, 2023)
एक छिद्र असलेले कांस्य धातूचे नाणे वाहत्या पाण्यात फेका. तुमचा मौल्यवान वेळ मित्रांमुळे वाया जाण्याची शक्यता आहे. काही जणांना बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना चांगली बातमी मिळेल. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा. घरात सायंकाळी भिमसेनी कापराचा धूप करा. कामात सहकाऱ्यांची मदत मिळेल.
शुभरंग : मोरपिसी

मीन (PISCES – Friday, july 28, 2023)
आजचा दिवस करमणुकीचा आहे. पैसे विनाकारण खर्च करू नका. घरात सुख-शांती आणि समृद्धता नांदेल. उगाचच वादविवाद, चिडचिड यापासून दूर राहाल. सायंकाळी बागेत फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. पिंपळाच्या झाडाखाली दर बुधवारी साखर ठेवा. कावळ्यांना गाठ्या खाऊ घाला. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.
शुभरंग : काळा