घराणेशाहीच्या टीकेवर गोगईंचा प्रतिहल्ला

देशातील काही पक्ष हे राजकीय घराणी चालवतात. एका घराण्यातले किती जण राजकारणात असावेत, यावर आमचा आक्षेप नाही. मात्र, पक्षाला राजकीय घराणे चालवतात हे लोकशाहीला मारक आहे, अशी नेहमीचीच घराणेशाहीवरील टेप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालवताच काँग्रेसच्या गौरव गोगई यांनी अमित शहा, राजनाथसिंग, प्रेमकुमार धूमल अशी भाजपातल्या घराणेशाहीची यादीच वाचून दाखविल्यावर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच गोंधळले. पंतप्रधानांचा चेहरा गोरामोरा झाला. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच गोंधळलेले दिसले.