हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, 20 मिनिटांपासून सर्व लोकल खोळंबल्या

हार्बर मार्गावरील डाऊन मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रॅक फ्रॅक्चर झाल्याने एकामागोमाग एक अशा अनेक लोकल खोळंबल्या आहेत. रेल्वेकडून तशा प्रकारची घोषणा लोकलमध्ये करण्यात आली असून प्रवाशांना ट्रॅकवर न उतरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.