68 वर्षाच्या महिलेने केला विश्वविक्रम, छंदातून घडवले भविष्य…वाचा सविस्तर

एखाद्या गोष्टीची आवड असली की, त्याचे छंदात रुपांतर होते. याच छंदातून भविष्यात मोठे यश मिळू शकते. उत्तर प्रदेशातील हरदोई येथे राहणाऱ्या महिलेच्या बाबतीतही हेच घडले आहे. येथील 68 वर्षाच्या एका महिलेने चक्क विश्वविक्रम केला आहे.

हरदोई येथील आवास विकास कॉलनी येथे राहणारी कुमुदनी देवी (68) या मूलभूत शिक्षण विभागात कार्यरत होत्या. मुख्याध्यापिका पदावरून त्या निवृत्त झाल्या होत्या. निवृत्तीनंतर एलएलबी करण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यातही त्या उत्तम गुणांनी त्या मूलभूत शिक्षण विभागात कार्यरत होत्या आणि मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाल्या होत्या. निवृत्तीनंतर तिने एलएलबी करण्यासाठी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, त्यातही त्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्या. एलएलबी पूर्ण केल्यानंतर, त्यांनी पहिल्याच प्रयत्नात ऑल इंडिया बार असोसिएशनची परीक्षा उत्तीर्ण केली. पहिल्याच प्रयत्नात वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या आणि वकिली करणाऱ्या कुमुदनी या सर्वात वयोवृद्ध महिला वकील ठरल्या आहेत.

कुमुदनी यांनी वयाच्या 68व्या वर्षी एलएलबी आणि पहिल्याच प्रयत्नात ऑल इंडिया बार असोसिएशनची परीक्षा उत्तीर्ण करून विश्वविक्रम केला. त्यामुळे ‘त्यांना वर्ल्ड्स ग्रेटेस्ट रिकॉर्ड सर्टिफिकेट’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

याविषयी कुमुदनी देवी सांगतात की, नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी लॉ महाविद्यालयात प्रवेश घेऊन वकिलीचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही त्या थांबल्या नाहीत. वय वाढले तरी त्यांनी त्यांचे शिक्षण थांबवले नाही. जसजसे वय वाढत होते तसतशा त्या पदव्याही संपादन करत होत्या. सध्या त्या एलएलएमचे शिक्षण घेत आहेत. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पीएचडी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तुरुंगातील निरपराधांना मुक्त करण्यासाठी लढणार…
कुमुदनी सांगतात की, नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्या वंचित, शोषित महिला आणि तुरुंगातील निरपराधांच्या मुक्तीसाठी खटला लढणार आहेत. निवृत्तीनंतर पेन्शन मिळते. त्यामुळे निरपराधांच्या मुक्तीसाठी लढण्याकरिता कोणतेही शुल्क घेणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.