ईडीला नको तेवढे अधिकार; लगाम हवा!

ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाला नको तेवढे अधिकार देण्यात आले आहेत. या अधिकारांना लगाम घालणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत वरिष्ठ विधीज्ञ अॅड. हरीश साळवे यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात व्यक्त केले. एम3एम रियल्टी ग्रुपच्या संचालकाच्या वतीने न्यायालयात बाजू मांडताना साळवे म्हणाले की, ईडीला वेळीच आवर घातला नाही तर या देशात कुणीही सुरक्षित राहणार नाही.

एम3एम रियल्टी ग्रुपचे संचालक बसंत बन्सल आणि पंकज बन्सल यांना अटक करताना त्यांच्या मूलभूत हक्कांचा भंग करण्यात आला. दोघेही सहकार्य करत असताना ईडीने त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचे साळवे म्हणाले.