लेख – जम्मू-कश्मीरची प्रगती आणि भारतीय सैन्य

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

सैन्याच्या विविध उपक्रमांमुळे कश्मीरमधील अर्थव्यवस्थेमध्ये उलाढाल वाढत आहे, त्यामुळे कश्मिरी अर्थव्यवस्था विकसित होत आहे. नोकऱया निर्माण झाल्यामुळे त्याचा लाभ सीमावर्ती भागातल्या आणि इतर दुर्गम भागांतल्या जनतेला मिळत आहे. कश्मीरच्या प्रगतीमध्ये सैन्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

जम्मू-कश्मीरात दहशतवादाचे पंबरडे मोडल्यामुळे राज्यांमध्ये पर्यटन हा अतिशय मोठा व्यवसाय बनलेला आहे. 1.88 कोटी पर्यटकांनी कश्मीरला 2022 मध्ये भेट दिली, जो गेल्या 75 वर्षांतला सर्वात मोठा रेकॉर्ड होता. बहुतेक पर्यटक हे श्रीनगर, गुलमर्ग, पहेलगाम आणि लडाखला भेट देण्यास उत्सुक असतात. गुलमर्गमध्ये असलेले अॅडव्हेंचर स्पोर्टस् आणि लडाख म्युझिकल फेस्टिव्हलला पर्यटकांनी मोठी दाद दिली. कश्मीरच्या 50 ते 60 टक्के लोकसंख्येला टुरिझममुळे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट फायदा होतो. कश्मीरमधली तीन विमानतळे जम्मू, श्रीनगर आणि लेह एअरपोर्टस्वर रोज 90 ते 95 विमानांच्या फ्लाइट्स लँड होत आहेत. अमरनाथ यात्रेमध्ये चार लाखांहून जास्त पर्यटकांनी अमरनाथला भेट दिली. हे सगळे घडले, कारण कश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था अत्यंत मजबूत झाली आहे. भारतीय सैन्याच्या मदतीने लाइन ऑफ पंट्रोलजवळ पूंछ आणि राजुरी जिह्यांमध्ये बॉर्डर टुरिझम पर्यटन सुरू झाले आहे. तिथे अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. याशिवाय युद्धभूमीला भेट देण्यासाठी काही कार्यक्रम विकसित करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पूंछ जिह्यामध्ये होम स्टे हे कश्मीर गव्हर्मेंटच्या मदतीने कार्यरत झाले आहेत. यामुळे या भागांमध्ये पर्यटन वाढत आहे.

नैसर्गिक आपदा, जसे काही महिन्यांपूर्वी वैष्णोदेवी यात्रेमध्ये आलेला अचानक पूर, यामध्ये सर्वात प्रथम आणि सर्वात जास्त मदत भारतीय सैन्याने केली. सैन्याच्या मदतीने जम्मू-कश्मीरमध्ये रस्ते बांधले जात आहेत. मोठय़ा प्रमाणात सैन्याचे बजेट जम्मू-कश्मीर राज्याच्या आत खर्च केले जाते, ज्यामुळे अर्थव्यवस्था, उद्योगधंद्यांना चालना मिळते. याशिवाय पर्यावरणाचे रक्षण, डिजिटल इंडिया, शिक्षणामध्ये हातभार अशा अनेक बाबींमध्ये भारतीय सैन्य हे जम्मू-कश्मीरमध्ये काम करून अर्थव्यवस्था बळकट करत आहे. जम्मू-कश्मीरमध्ये एक लाख 90 हजार भूतपूर्व (रिटायर्ड) सैनिक राहतात, जे राज्याच्या प्रगतीमध्ये मोठा हातभार लावतात. भारतीय सैन्य अग्निवीर बनण्याकरिता कश्मीरमध्ये अनेक ट्रेनिंग पॅम्प चालवते, ज्यामुळे जम्मू-कश्मीरमधले चौदाशे अग्निवीर प्रत्येक वर्षी सैन्यामध्ये भरती होत आहेत.

जम्मू-कश्मीरमध्ये नॅशनल पॅडेट कोर सैन्यामुळे अतिशय लोकप्रिय आहे आणि 40 हजारांहून जास्त पॅडेट्स आज एनसीसी ट्रेनिंग घेतात. जम्मू-कश्मीरमध्ये भारतीय सैन्य वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा चालवते, ज्या अतिशय लोकप्रिय आहेत. 36 आर्मी गुडविल स्कूल्स, 25 आर्मी प्रायमरी स्कूल, 3 आशा स्कूल फॉर हॅंडिपॅप चिल्ड्रन, 1सैनिक स्कूल, ज्यामध्ये 70 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. याशिवाय भारतीय सैन्याने विद्यांजली कार्यक्रमाखाली राज्यातल्या सीमावर्ती भागामध्ये 38 शाळा दत्तक (adopt) घेतल्या आहेत . आर्मीने केलेल्या कोचिंगमुळे अनेक विद्यार्थी कबड्डी, अॅथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलीबॉल, आईस हॉकी, आर्चरी, मार्शल आर्टस् कॉम्पिटिशनमध्ये राष्ट्रीय लेव्हलला मेडल मिळवत आहेत. भारतीय सैन्यामुळे अॅडव्हेंचर स्पोर्टस्… आईस हॉकी, मॅरेथॉन, रिव्हर राफ्टिंग, माऊंटन बाइकिंग, पॅराग्लायडिंग पहेलगाम, सोनमर्गमध्ये शिकवले जाते. दुर्गम भागामध्ये रस्ते बांधणे, इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट तयार करणे, सोलर लाईट लावणे, पूल बांधणे हे काम चालू असते.

भारतीय सैन्याचे 4.4 लाख सैनिक, एअरपर्ह्सचे सात हजार एअरमन कश्मीरमध्ये तैनात आहेत. कश्मीरमधल्या सैनिकांचा वार्षिक पगार 38 हजार कोटींहून जास्त आहे. यामधला वीस टक्के पगार कश्मीरमध्ये खर्च केला जातो. म्हणजेच 7500 कोटी रुपये भारतीय सैनिक प्रत्येक वर्षी कश्मीरमध्ये खर्च करतात, ज्याचा फायदा छोटे दुकानदार, वेगवेगळ्या सर्व्हिस देणारे बार्बर, धोबी, रिपेअर करणारे, एअर आणि टॅक्सी सर्व्हिसेस, हॉटेल, आजूबाजूचे भाजीवाले, विव्रेते यांवर खर्च होतो, ज्यामुळे कश्मीरच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. बहुतेक खर्च सीमेवर दुर्गम भागामध्ये केला जातो, ज्यामुळे तेथील विकास होत आहे.

याशिवाय भारतीय सैन्य सैनिकी कामाकरिता कश्मीरमध्ये पैसा खर्च करतात. आर्मी सर्व्हिस कोर 220 कोटी, रुपये आर्मी ऑर्डनन्स कोर 365 कोटी रुपये, आर्मी मेडिकल कोर 125 कोटी रुपये, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी 80 कोटी, रुपये रस्तेबांधणी 500 कोटी रुपये, रस्त्यांचे रिपेअर चौदाशे कोटी रुपये, बॉर्डर रोडने बांधले जाणारे रस्ते 2200 कोटी रुपये असे सैन्याचे दरवर्षी सहा हजार पाचशे कोटी रुपयांचे कॉन्ट्रक्ट कश्मीरमध्ये दिले जातात, जे तिथल्या लोकांनाच मिळतात. हाय अल्टिटय़ूडमध्ये 11 हजार पोर्टर आणि पोनी, सिव्हिलियन टॅक्सी ड्रायव्हर, ऑर्डनन्स, मेडिकल सप्लाय, इंजिनीयर्समध्ये काम करणारे विविध कामगार, डिफेन्स पोर्टर पंपनी हे सगळे मिळून 1100 कोटींहून जास्त पैसा खर्च करून एक लाख 53 हजार लोकांना दरवर्षी सैन्याकडून नोकऱया दिल्या जातात.

कश्मिरी भगिनींना सैन्याच्या हॉस्पिटल्स, सीएसडी पॅन्टीन, शॉपिंग सेंटरमध्ये नोकऱया दिल्या जात आहेत. या भागातील शेतकऱयांना आधुनिक पद्धतीने केशर, मशरूम, अॅपल फार्ंमग यांसारख्या विविध प्रोजेक्टमध्ये सैन्याकडून तांत्रिक मदत दिली जाते. त्यामुळे शेतकऱयांचे उत्पन्न वाढत आहे. सीमावर्ती भागात भारतीय सैन्य 25 हजार कोटी रुपये खर्च करून 60 हजार किलोमीटर एवढय़ा लांब ऑप्टिकल फायबर केबल टाकत आहे. यामुळे 133 सीमा भागात असलेल्या गावांना मोबाईल कम्युनिकेशन मिळेल आणि ते देशाच्या इतर भागांशी जोडले जातील. हा कार्यक्रम जरी भारत सरकारचा असला तरी या कार्यक्रमांमध्ये भारतीय सेना ही लीड एजन्सी आहे. यामुळे या भागात डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जॉब्स क्रिएट होत आहेत.