कोपरगाव जलकुंभास गुरु शुक्राचार्य महाराज यांचे नाव द्यावे, भक्तांनी निवेदन देत केली मागणी

कोपरगाव शहरात नगर मनमाड रस्त्यालगत असलेल्या साईबाबा तपोभूमी लगत च्या नव्याने होत असलेल्या जल कुंभाला ज्यांच्यामुळे कोपरगावची कीर्ती जगभर पसरली अशा गुरु शुक्राचार्य महाराज यांचे नाव जलकुंभास द्यावे अशी मागणी गुरु शुक्राचार्य भक्तांनी केली आहे. गुरु शुक्राचार्य महाराज यांची तपोभूमी म्हणून तसेच गुरु शुक्राचार्य महाराजांकडे असलेल्या संजीवनी मंत्रामुळे व त्यांनी येथे केलेल्या विवाहसिद्ध होमामुळे तसेच या मंदिरास कधीही कुठल्याही शुभकार्यास मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही या दुर्मिळ आशीर्वादामुळे आज हे मंदिर संपूर्ण भारतभरच नव्हे तर जगाच्या पाठीवर झळकू लागले आहे.

त्यामुळे कोपरगाव शहराची ओळख ही वाढली आहे, परंतु आम्हा सर्व शुक्राचार्य भक्तांना एक खंत पूर्वीपासून आहे, ज्या शुक्राचार्य महाराजांमुळे कोपरगाव शहराचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले त्या शुक्राचार्य महाराजांचे नाव कोपरगावात कोठेही दिसत नाही. कुठल्याही इमारतीला किंवा कुठल्याही वास्तूला त्यांचे नाव नाही ही खंत सर्व ग्रामस्थांची, ट्रस्टींची ,स्थानिक व्यवस्थापन कमिटीची तसेच तमाम शुक्राचार्य भक्तांची पूर्वीपासूनची आहे. त्यासाठी आज मुख्य अधिकारी सुहास जगताप यांना त्याबाबत निवेदन दिले. या निवदेनात साईबाबा कॉर्नर येथे फिल्टरेशन प्लांट जवळ होत असलेल्या नवीन जलकुंभाला परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज जलकुंभ असे नाव द्यावे. यावेळी गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदीर प्रमुख प्रसाद प-हे, कमिटी मेंबर संजय वडांगळे ,अरुण जोशी धरम बागरेचा, शैलेश साबळे, बाळासाहेब लकारे आदी भक्तगण उपस्थित होते. या कामी योग्य ते पाऊल उचलले जाईल असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले अशी माहिती सचिन परदेशी यांनी दिली.