प्रेमाच्या नावाखाली घेतला सूड, तरुणीची दिवसाढवळ्या कुऱ्हाडीने वार करून हत्या

प्रेमाच्या नावाखाली सुड घेणाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नकार पचवण्याची क्षमता नसलेल्या मजनूंमुळे निष्पाप तरुणींना आपला जीव गमवावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार कर्नाटकात घडला असून 20 वर्षीय तरुणीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या करण्यात आली आहे.

कर्नाटकातील खानापूर येथील शिवाजी नगर येथे गुरुवारी एक धक्कादायक घटना गडली. 20 वर्षीय शेतपल्ली आलेख्य ही तरुणी आपल्या काही कुटुंबीयांसह घरी निघाली होती. याचवेळी आरोपी श्रीकांतने शेतपल्लीची वाट अडवली आणि तिच्यावर कुऱ्हाडीने वार करायला सुरुवात केली. तिच्या कुटुंबीयांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता ते सुद्धा जखमी झाले. या भयंकर हल्ल्यात शेतपल्लीचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतपल्ली आलेख्यचा जागीच मृत्यू झाला तर तिच्या सोबत असणाऱ्या कुटुंबीयांना किरकोळ दुखापत झाली. हे तिघे टेलरच्या दुकानातून घरी निघाले होते. तेव्हाच त्यांच्यावर श्रीकांतने हल्ला केला. पोलिसांनी पुढे सांगितले की, शेतपल्ली आणि श्रीकांत यांची मैत्री होती. श्रीकांतने तिला दोन वर्षांपूर्वी लग्नासाठी विचारणा केली होती. पण तिने श्रीकांतला नकार दिला होता. काही दिवसांपूर्वी तिचे जगतियामधील एक पुरुषाशी लग्न ठरले होते. ते लग्न मोडण्याचा श्रीकांतने प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. त्यामुळेच त्याने तिचा खून केला.

सध्या आरोपी फरारा असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.