काँग्रेसच्या नसीम खान यांची नाराजी अखेर दूर; लवकरच महाविकास आघाडीच्या प्रचारात होणार सहभागी

काँग्रेसचे माजी मंत्री आणि अल्पसंख्याक नेते नसीम खान यांची नाराजी अखेर दूर करण्यात पक्षश्रेष्ठाRना यश आले आहे. मी काँग्रेसच्या विचारधारेशी बांधील असल्याचे स्पष्ट करीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेस नेते नसीम खान इच्छुक होते; पण या मतदारसंघातून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज झाले आणि त्यांनी काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठाRनाही पत्र दिले होते. लोकसभा निवडणुकीत राज्यात अल्पसंख्याक उमेदवार न दिल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

काँग्रेसने या पत्राची गंभीर दखल घेतली पत्राची गंभीर दखल पक्षश्रेष्ठाRकडून घेण्यात आली. पुणे दौऱयात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी नसीम खान यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांची नाराजी दूर झाली आहे. स्टार प्रचाराक पदाचा दिलेला राजीनामा आपण मागे घेत असून लवकरच प्रचारात सक्रिय सहभागी होणार असल्याचे नसीम खान यांनी मुंबईत जाहीर केले. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, अमरजित मनहास, नाना गावंडे आदी उपस्थित होते.