एनसीबीने केला ड्रगमाफियांचा पर्दाफाश 

नार्कोटिक्स पंट्रोल ब्यूरो (एनसीबीने)कारवाई करून आंतरराज्य ड्रग तस्करी करणाऱया टोळीचा पर्दाफाश केला. एनसीबीने कारवाई करून अल्प्राझोलमच्या 25 हजार गोळय़ा जप्त केल्या. याप्रकरणी दोघांना एनसीबीने अटक केली. अटक केलेले दोघेही ड्रग सिंडिकेटमध्ये सक्रिय होते. त्या दोघांकडून जप्त केलेल्या गोळय़ा ते काळाबाजारात विक्री करणार होते अशी माहिती तपासात समोर आली आहे.  

ड्रग तस्करी करणाऱया टोळीची माहिती एनसीबीला मिळाली. त्या माहितीनंतर एनसीबीने दादर स्थानकात कारवाई करून 25 हजार गोळय़ा जप्त केल्या. त्याप्रकरणी दोघांना अटक केली. हे ठाणे जिह्यातील सिंडिकेट असल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे. मुंब्रा येथील इम्तियाज नावाचा एकजण हा नियमित औषध खरेदी करत होता. त्याला गुजरातमधील एक व्यावसायिक हा औषध पुरवत असायचा. त्यानंतर एनसीबीचे एक पथक गुजरात येथे गेले होते.  

सफाई कामगार बनून फोडायचा घर  

सफाई कामगार म्हणून सोसायटय़ांमधील बंद सदनिका पह्डणाऱया दोघांना एमएचबी पोलिसांनी अटक केली. इश्तियाक अन्सारी आणि सुनीलकुमार पाणिग्रही अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांच्या अटकेने काही गुह्यांची उकल होणार आहे.  

तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. त्यांचा दहिसर येथे इमिटेशन ज्वेलरीचा कारखाना आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांच्या कारखान्यात चोरी झाली होती. चोरटय़ाने कारखान्यातील ज्वेलरी आणि पह्टोग्राफी बॉक्स चोरून नेला होता. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, सहाय्यक निरीक्षक सूर्यकांत पवार, शिंदे, खोत, सावळी, मोरे आणि रुपाली दाईंगडे आदीच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली. त्या फुटेजनंतर पोलिसांचे पथक कल्याण येथे गेले.  

पोलिसांना इश्तियाकची माहिती मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या चौकशीत सुनीलचे नाव समोर आले. त्याला अंबरनाथ येथून पोलिसांनी अटक केली. सुनीलकडून पोलिसांनी ज्वेलरी आणि मोबाईल जप्त केला आहे. इश्तियाक हा सफाई कामगार असून रात्रीच्या वेळेस सोसायटय़ांमध्ये जाऊन रेकी करतो. रेकी केल्यानंतर सुनीलच्या मदतीने तो घर पह्डतो अशी त्याची गुह्याची पद्धत आहे. या टोळीने शिवाजी पार्क येथे एका सीएचे कार्यालयदेखील पह्डले होते. इश्तियाक आणि सुनीलविरोधात गुन्हे दाखल आहेत.  

अभिनेत्यासोबत मीटिंगच्या नावाखाली लावला गंडा

अभिनेता आर्यन कार्तिकसोबत मीटिंग आणि चित्रपट निर्मिती करतो असे सांगून महिलेची 87 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबोली पोलिसांनी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.  

तक्रारदार या महिला असून त्या अंधेरी परिसरात राहतात. काही महिन्यांपूर्वी एक जण त्याना भेटला होता. त्याने अभिनेता आर्यन कार्तिकसोबत मीटिंग करून देतो असे सांगितले होते. तसेच चित्रपट निर्मिती करून देतो असे त्यांना सांगण्यात आले. तक्रारदार याने एकाला आर्यन कार्तिकसोबत आगामी चित्रपटाच्या निर्मितीबाबत विचारणा केली. त्याने आर्यन कार्तिकसोबत मीटिंग करून दिली नाही. पैशाबाबत तक्रारदार याने मागणी केली. तेव्हा तो व्यक्ती पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने अंबोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. अंबोली पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.  

पैसे डबल करण्याच्या नावाखाली लावला चुना  

पैसे डबल करून देतो असे सांगून चौघांनी मेपॅनिकची अकरा लाख रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूकप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. मेपॅनिक अकबर शेख यांना तीन दिवसांपूर्वी  एकाचा पह्न आला. खार येथे एक जण पैसे डबल करून देतो असे त्याना सांगितले होते. पैसे डबल होणार असल्याने शेखने होकार दिला. होकार दिल्यावर शेखने तामीळनाडू येथील घर विक्री करून आणि व्याजाने पाच लाख असे अकरा लाख रुपये जमा केले. ठरल्यानुसार रविवारी शेख आणि त्याचा भाऊ हे खार येथे गेले. तेथे त्यांना एक जण भेटला. त्याने आपण थोडय़ा वेळात परत येतो असे सांगितले, मात्र तो परत आला नाही.  

सोमवारी शेख यांना पुन्हा एकाने पह्न केला. तो व्यक्ती भेटणार असल्याचे सांगितले. त्यानुसार शेख हे पैसे घेऊन जोगेश्वरी येथे आले. पैसे डबल करून देतो असे सांगून शेख यांना अगरबत्ती, हार, फुले आणि गुलाबजल आणण्यास सांगितले. एकाच्या घरी शेख हे भेटले. तेव्हा त्यांना एक पाकीट देण्यात आले. त्यात गुलाबाच्या पाकळय़ा आणि गुलाबजल शिंपडले. त्यानंतर एकाने लाईट बंद केला. एक ठग हा मंत्र उच्चारत होता. ठगाने पेटीतील अकरा लाखांच्या नोटा काढून त्याऐवजी खोटय़ा नोटा त्यात टाकल्या. 

तुरुंगातून बाहेर पडताच करू लागला चोऱया  

लोकल प्रवासात प्रवाशाची सोनसाखळी चोरून पळालेल्या चोरटय़ाला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. काwर असे त्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी तो तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. बाहेर येताच तो पुन्हा चोऱया करू लागला.  

तक्रारदार हे विरार येथे राहतात. गेल्या महिन्यात त्याने अंधेरी येथून विरारला जाणारी लोकल पकडली. ती लोकल कांदिवली स्थानकात थांबली. तेव्हा काwर हा त्या डब्यात चढला. तक्रारदार हे बेसावध असताना काwरने त्याच्या गळय़ातील सोनसाखळी चोरून धावत्या लोकलमधून उडी मारून पळ काढला. सोनसाखळी चोरीप्रकरणी त्याने बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम याच्या पथकाने तपास सुरू केला.  

तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये पोलिसांना काwर दिसला. त्यावरून तपासाची चव्रे फिरली. पोलिसांनी काwरला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने गुह्याची कबुली दिली. घटनेच्या काही दिवस अगोदर काwर हा तुरुंगातून सुटला होता. तुरुंगातून बाहेर येताच तो पुन्हा चोऱया करू लागला. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.