श्रीरामाचे दर्शन घडले, पाषाणातून शब्द उमटले

पतितांना तू करिसी पावन

जन वदती तुज पतित पावन

प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठीचे सर्व विधी 16 जानेवारीपासून सुरू झाले असून शुक्रवारी रामरायाच्या तेजस्वी चेहऱयासह संपूर्ण मूर्ती समोर आली. अवघ्या जगाने रामरायाच्या मूर्तीचे पहिले दर्शन घेतले. चेहऱयावर तेज, डोक्यावर मुकुट, आभामंडल. स्वस्तिक, ओम, चक्र, गदा आणि सूर्य भगवान… निळय़ा पाषाणात कोरलेली ही रामरायाची मूर्ती मन प्रसन्न आणि प्रफुल्लित करत आहे. प्रभू श्रीरामाची संपूर्ण मूर्ती विष्णूच्या दहा अवतारांचा महिमा सांगताना दिसत आहे. मूर्तीची उंची 4 फूट 24 इंच तर रुंदी 3 फूट आहे. मूर्तीचे एकूण वजन 200 किलो इतके आहे.