नि:पक्ष चौकशी करून कोणावर अन्याय होऊ देणार नाही, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक

जालन्यातील अंतरवाली सराटी आमरण उपोषणदरम्यान झालेल्या लाठीहल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी 6 सप्टेंबर बुधवारी सकाळी ग्रामस्थांशी संवाद साधुन नि:पक्ष चौकशी करून कोणावर अन्याय करणार नसल्याचे सांगितले.

पुढे बोलताना संजय सक्सेना म्हणाले की, चौकशीसाठी पोलिसांची वाहने गावात आली तरी ग्रामस्थांनी घाबरू नये , प्रशासन आणि नागरिक यातील दरी कमी करण्यासाठी आमचे मुख्य उद्देश ठेवून यापुढे प्रशासनाचे तुम्हाला पुर्ण सहकारी राहील , अशी ग्वाही सक्सेना यांनी अंतरवाली सराटी ग्रामस्थांना दिली. तसेच सक्सेना यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेवून संवाद साधला.

अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना याबरोबर, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. घटनेनंतर जे गुन्हे दाखल झाले आहेत त्या बाबत सखोल चौकशी करून, विनाकारण कुणाला त्रास देणार नसल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

गावकऱ्यांनी ठरवली आचारसंहिता समन्वय समिती

अधिकारी, राजकीय नेते यांच्या भेटीदरम्यान कुठलेही गालबोट लागु नये म्हणून गाव नियमित प्रशासनाच्या संपर्कात राहून गावात शांतता रहावी, यासाठी ग्रामस्थांनी काही अचार संहिता तयार केली जाणार आहे. यातगावात येणाऱ्यांनी घोषणाबाजी करू नये, मद्यपिवून कोणीही गावात येवू नये. गोंधळ घालू नये आदी सूचना दिल्या जाणार आहेत. सूचना फलक गावात लावून, सोशल मीडियावरही प्रसिद्ध केले जाणार,आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या लढ्यातील आंदोलन सर्वांनी शांततेत करावे. अशी पंचसूत्री ग्रामस्थांनी बनवली असून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.