ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; राबोडी पोलीस ठाणे राज्यात सर्वोत्कृष्ट

2021 या वर्षातील कार्यमूल्यांकनाच्या बाबतीत परिक्षेत्र निहाय व आयुक्तालय निहाय प्राप्त उत्कृष्ट पोलीस ठाण्यांमधून खालीलप्रमाणे क्रमनिहाय सर्वोत्कृष्ट 5 पोलीस ठाण्यांची शिफारस राज्य स्तरावरील समितीने केलेली होती. त्यामध्ये ठाणे शहर पोलीस दलातील राबोडी पोलीस ठाण्याचे नाव असल्याने ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. राबोडी पोलीस ठाणे हे राज्यात सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्याच्या यादीत असून केवळ ठाणे जिह्यातच नव्हे तर कोकण विभागातील एकमेव सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे ठरले आहे.

2016 मध्ये झालेल्या डीजीपी कॉलरन्समध्ये निकोप स्पर्धा वाढावी, तसेच कायदा व सूब्यवस्था, गुन्हे’ प्रतिबंध, दोषसिध्दी यामध्ये सुधारणा करावी यासाठी देशपातळीवर 10 सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला. या पोलीस ठाण्यांची निवड केंद्रीय गृह मंत्रालयाकडून करण्यात येते. 2020 पासून ही स्पर्धा सुरू झाली असून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या पोलीस ठाण्यांना सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरवण्यात येते.यासाठी राज्य स्तरावर समिती गठीत करण्यात आली होती

2021 या वर्षातील कार्यमुल्यांकनाच्या बाबतीत परिक्षेत्र निहाय व आयुक्तालय निहाय प्राप्त उत्कृष्ट पोलीस ठाण्यांमध्ये सर्वोत्कृष्ट 5 पोलीस ठाण्यांची शिफारस राज्य स्तरावरील समितीने केलेली असून त्या 5 पोलीस ठाण्यांना सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे- 2021 म्हणून घोषित केल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी काढलेल्या पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

सर्वोत्कृष्ट म्हणून निवड झालेली पोलीस ठाणे
शिवाजीनगर पोलीस ठाणे (कोल्हापूर)
देगलूर पोलीस ठाणे (नांदेड)
वाळुंज पोलीस ठाणे (छत्रपती संभाजीनगर शहर)
अर्जुनी मोर पोलीस ठाणे (गोंदिया)
राबोडी पोलीस ठाणे (ठाणे शहर)