मी तुमच्यासारखा गद्दार नाही, मला बोलायला लावू नका… उरलीसुरली राहू द्या; राजन विचारे यांनी मिंध्यांची सालटी काढली

मी गेली 40 वर्षे धर्मवीर आनंद दिघे यांच्या सोबत होतो. तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे काढले आहेत. त्यावेळी तुम्ही कुठे होतात? आनंद दिघे यांच्या निधनानंतर तुमचा उदय झाला. आता ठाणे महापालिकेची तुम्ही साफ वाट लावली आहे, कर्मचाऱयांच्या भविष्य निर्वाह निधीवरही डल्ला मारला आहे, मी तुमच्यासारखा गद्दार नाही. मला बोलायला लावू नका. उरली सुरली राहू द्या, असे खडेबोल सुनावत शिवसेना नेते व ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांनी आज मिंध्यांची सपशेल सालटीच काढली.

ठाणे लोकसभा निवडणुकीत राजन विचारे यांना नवी मुंबई, ठाण्यापासून ते मीरा, भाईंदरपर्यंत जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मिंधेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांनी मारून मुटकून उभे केलेल्या नरेश म्हस्के यांच्याविरोधात खुद्द भाजपमध्येच संतापाचा भडका उडाला आहे. शेकडो पदाधिकाऱयांनी म्हस्पेंचे काम करणार नाही, असे सांगत राजीनामे दिले आहेत. गणेश नाईकांच्या कुटुंबीयांनी तर आज ठाण्यात झालेल्या महायुतीच्या मेळाव्याकडे सपशेल पाठ फिरवली. त्यामुळे बिथरलेले मिंधे आणि म्हस्के यांनी मेळाव्यात राजन विचारे हे नकली शिवसैनिक आहेत आणि विचारे नव्हे म्हस्के हेच दिघेंचे शिवसैनिक आहेत असे तारे तोडले. या आरोपाला विचारे यांनी मुहतोड जवाब दिला.

एकनाथ शिंदे हे 2013 पासूनच शिवसेनेशी गद्दारी करत होते. पाच आमदारांना घेऊन ते काँग्रेसमध्ये जाणार होते. त्यांना शिवसेना संपवायचीच होती, असा आरोप राजन विचारे यांनी केला. नरेश म्हस्केही मिंध्यांच्या छळाला पंटाळून काँग्रेसमध्ये जाणार होते. मात्र त्यावेळेला मी त्यांना थांबवले याची आठवणही विचारे यांनी करून दिली.

आमच्यामुळे राजन विचारे निवडून येत होते, अशी मल्लीनाथी मिंध्यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याला सणसणीत उत्तर देताना राजन विचारे म्हणाले, 2014 साली हे मिंधे त्यांच्या मुलाला घेऊन मातोश्रीवर गेले आणि तिकीट मागून घेतले. त्यानंतर दोन निवडणुकीत केवळ त्यांच्या पुत्राचेच काम केले. मी आणि माझा मुलगा एवढेच त्यांचे राजकारण होते. त्यावेळी ‘राजन विचारेंना वाऱयावर सोडून एकनाथ शिंदे कल्याणला’ अशा बातम्याही वृत्तपत्रांमध्ये छापून आल्या होत्या. त्या परिस्थितीतही मी लढलो आणि जिंकून आलो. माझ्याकडे खोके नव्हते. मी पैशांच्या जीवावर निवडून आलेलो नाही. माझ्या स्वतःच्या जीवावर आणि कामावर निवडून आलो आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे खडेबोलही विचारे यांनी सुनावले. धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मला सर्वकाही मिळाले, अशी कृतज्ञताही विचारे यांनी व्यक्त केली.

नरेश म्हस्के कुप्रसिद्ध गोल्डन गँगचा लीडर

नरेश म्हस्के कोरोना काळात कुठे होता? तो तर घरात लपून बसला होता. महापौर पदाच्या कारकिर्दीत त्याने काय काम केले हे सांगावे. त्यावेळी तो हात धुवून घेत होता. कुप्रसिद्ध गोल्डन गँगचा लीडर हीच त्याची ओळख आहे. म्हस्केने फक्त ठाणे पालिका लुटण्याचे काम केले, अशा शब्दात विचारे यांनी म्हस्पेंचा बुरखा टराटरा फाडला.

मिंधेंना आमदारकीचे तिकीट मीच मिळवून दिले

शिवसेनेत मला 40 वर्षे झाली आहेत आणि मिंध्यांचा उदय आता धर्मवीर आनंद दिघे यांच्या निधनानंतर झाला आहे. आजवर एकनाथ शिंदेंच्या सुखदुःखात मी सामील होतो. मिंध्यांना आमदारकीचे पहिले तिकीट मीच मिळवून दिले. सभागृह नेते पदही मी त्यांच्यासाठी सोडले. पण तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी शिवसेनेशी गद्दारी केली. काँग्रेस, राष्ट्रवादी पह्डली. तुम्ही फक्त सेटिंगचेच राजकारण केले आहे. ठाणे महापालिकेची तर वाट लावली आहे. मिंधेंची गद्दारी ही फक्त खुर्चीसाठी होती, असेही विचारे यांनी मिंध्यांना खडखडवले. आनंद दिघे यांनी प्रतिष्ठापना केलेल्या टेंभीनाक्याच्या देवीसमोर लागणारे बॅनर काढून टाकत मिंधे यांनी स्वतःचे बॅनर लावले. दिघे यांच्या आनंदाश्रमाची पाटी काढून तेथे स्वतःच्या नावाची पाटी लावली. त्यामुळे दिघेंवरील यांचे प्रेम काय होते हे आम्हाला माहीत आहे. आता मला जास्त बोलायला लावू नका, असा इशाराच विचारे यांनी दिला.

धर्मवीरचे ‘दिग्दर्शक’ तुम्हीच, जनतेला खोटा सिनेमा दाखवला

धर्मवीर सिनेमात असलेले सगळेच प्रसंग खरे नाहीत अशी जाहीर कबुलीच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिंधे गटाच्या मेळाव्यात दिली. त्यालाही राजन विचारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, धर्मवीर सिनेमाचे ‘दिग्दर्शक’ तुम्हीच होतात. मग त्यात दाखवलेले प्रसंग खोटे कसे? असा सवाल विचारे यांनी केला. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दोन वर्षानंतर तुम्ही सिनेमात खोटे प्रसंग असल्याचे सांगता, याचाच अर्थ तुम्ही जनतेला खोटा सिनेमा दाखवला असे तडाखेही राजन विचारे यांनी लगावले.

बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत, अशी बतावणी मिंधे करतात. बाळासाहेबांचे विचार हे शिवसेना पह्डण्याचे होते काय? मोठी वादळे येऊनसुद्धा त्यांनी पक्ष अखंड ठेवला होता. आनंद दिघेंवर बाळासाहेबांचा संपूर्ण विश्वास होता. पण दिघे साहेबांनी ठाणे जिह्यात बांधलेली शिवसेना मिंध्यांना संपवायची होती.
z राजन विचारे, शिवसेना नेते

गद्दारांचा 700 कोटींचा घोटाळा रावसाहेब दानवेंनी दाबला, निवडणुकीसाठी खोतकर आणि सत्तारांशी मांडवली

मिंधे गटाचे अर्जुन खोतकर यांच्याशी भाजपचे जालना मतदारसंघाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी मांडवली केली आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना साखर कारखाना तसेच लालबाग जिनिंगमध्ये झालेल्या 700 कोटींचा घोटाळाच दानवे यांनी दाबला आहे, असा गौप्यस्पह्ट आम आदमी पार्टीचे पैलास फुलारी आणि सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी केला आहे.
भ्रष्टाचार शिरोमणी असलेले राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शेकडो घोटाळय़ांनाही दानवे यांनीच राजकीय लाभासाठी संरक्षण दिले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

आम आदमी पार्टीचे पैलास फुलारी आणि सामाजिक कार्यकर्ते महेश शंकपेल्ली यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या स्वार्थी तसेच मतलबी कारभाराचा पर्दाफाश केला. जालना कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना सहकारी साखर कारखाना तसेच लालबाग जिनिंगमध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाला. हा सर्व घोटाळा आम आदमी पार्टीने चव्हाटय़ावर आणला. त्यावेळी बाजार समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर होते. ईडी चौकशीच्या भीतीने गर्भगळित झालेले अर्जुन खोतकर यांनी मिंध्यांची चाकरी सुरू केली.

खोतकरांच्या काळात झालेल्या 200 कोटी रुपयांच्या घोटाळय़ाची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी आपण स्वतः सर्व कागदपत्रे रावसाहेब दानवे यांना दिली. बाजार समितीच्या घोटाळय़ानंतर जालना कारखाना, लालबाग जिनिंगसह इतर संस्थांमध्ये झालेल्या घोटाळय़ाची प्रकरणाचे पुरावेही त्यांना देण्यात आले. या सर्व प्रकरणात कारवाई करण्याचा शब्द दानवे यांनी दिला होता. परंतु कित्येक महिने उलटले पण कारवाई झाली नाही. निवडणूकीत पिछाडीवर गेल्याचे लक्षात येताच रावसाहेब दानवे हे अर्जुन खोतकरांच्या चरणी लीन झाले. याचाच अर्थ राजकीय मांडवली करून त्यांनी तब्बल 700 कोटी रुपयांच्या घोटाळय़ाला संरक्षण दिले असल्याचा स्पष्ट आरोप आम आदमी पार्टीचे पैलास फुलारी यांनी केला.