आर्टिस्टिक स्केटिंगसाठी याशवी, राहुलची हिंदुस्थानी संघात निवड

येत्या 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 पासून चीनमधील हाँगझाऊ शहरात होणाऱया 13 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आर्टिस्टिक स्केटिंग क्रीडा प्रकारासाठी प्रबोधनकार ठाकरे संकुलाच्या याशवी शाह व राहुल येलुरी यांची निवड झाली आहे. तसेच कुंज चोक्सी (गुजरात), वाकाशा नगुला लक्ष्मी नारायण (चेन्नई), आकुलासाई सांमंता (आंध्र प्रदेश), अभिजित अमलराज (केरळ), दोंत्रा ग्रिष्मा (आंध्र प्रदेश) यांचीही हिंदुस्थानी संघात निवड करण्यात आली आहे. याशवी आणि राहुलच्या निवडीचे संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी अभिनंदन केले असून त्यांना सोनेरी यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.