Lok Sabha Election 2024 : नाशिकच्या जागेवरून महायुतीत जुंपली; आता छगन भुजबळ यांनी भाजपला लगावला टोला

chhagan-bhujbal

नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत कलह सुरू आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट या तिन्ही पक्षांकडून उमेदवारीसाठी दावा करण्यात येत असल्याने तिढा कायम आहे. आता अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेवरून महायुतीतील मित्रपक्ष भाजपलाच टोला लगावला आहे.

नाशिकमध्ये शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारीसाठी जोरदार फिल्डींग लावली. तर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. रामनवमीच्या निमित्ताने या दोन्ही इच्छुक नेत्यांची नाशिकच्या काळाराम मंदिरात भेट झाली. यावेळी हेमंत गोडस हे भुजबळांच्या पाया पडले. नाशिकच्या उमेदवारीबाबत माध्यमांनी प्रश्न विचारल्यावर छगन भुजबळांनी संताप व्यक्त केला.

Lok Sabha Election 2024 : छगन भुजबळ कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार?

काय म्हणाले छगन भुजबळ?

सर्वांना सुखी ठेवा, मंदिरातून आशीर्वादचा हार घेऊन आलोय. हेमंत गोडसे माझे मित्र आहेत. पण मी अनेकदा मंदिरात येतो. आज रामनवमीनिमित्त दर्शनासाठी आलो. तेही मंदिरात आले होते. त्यावेळी मी त्यांना शुभेच्छा दिल्या, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

भुजबळांच्या उमेदवारीला मिंधे गटाचा विरोध; गोडसेंची पळापळ

नाशिकमध्ये ज्यांना उमेदवारी द्यायची असेल त्यांना द्या. पण 20 मे च्या आधी निर्णय घ्या. कारण 20 मे चा मुहूर्त आहे. त्या आधी निर्णय झाला तर बरं होईल. कुठल्याही पक्षाला जागा सोडा, पण 20 मे च्या आधी सोडा, असा टोला छगन भुजबळ यांनी भाजपला लगावला आहे.