Asian Games 2023 – भोरियास देवला संधी; पंघाल, नितूला डच्चू

हांगझोऊ (चीन) येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हिंदुस्थानचा बॉक्सिंग संघ रविवारी जाहीर झाला. जागतिक कांस्यविजेता दीपक भोरिया आणि निशांत देव यांना या संघात स्थान स्थान मिळाले असून अनुभवी अमित पंघाल आणि नितू यांना डच्चू देण्यात आला आहे. ही स्पर्धा 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत होत आहे.

2022 मधील जागतिक कास्यपदक विजेता प्रवीण हुडा, राष्ट्रकुल स्पर्धेतील कास्यपदक विजेती जयस्मिन लांबोरिया, अरुंधती चौधरी, प्रीती पवार, अनुभवी निखत झरीन आणि लोवलिना यांच्यावर आशिया क्रीडा स्पर्धेत पदकांची अपेक्षा असेल. दोन वेळची जगज्जेती निखत आणि टोकियो ऑलिम्पिकमधील कास्यपदक विजेती लोवलिना यांना पसंती मिळणे स्वाभाविक होते, तरीही त्यांनी मार्च महिन्यात झालेल्या जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवून आपली निवड पक्की केली होती. ही आशियाई क्रीडा स्पर्धा पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धाही असणार आहे.

निवड झालेला हिंदुस्थानी संघ –

महिला – निखत झरीन (51 किलो), प्रीती पवार (54), परवीन हुडा (57), जयस्मिन लांबोरिया (60), अरुंधती चौधरी (66) आणि लोवलिना ब्रोगोहिन (75).

पुरुष – दीपक भोरिया (51), सचिन सैवाच (57), शिवा थापा (63.5), निशांत देव (71), लक्ष्य चहर (80), संजीत (92), नरेंदर ब्रेवाल (92 औ).