नारींग्रे येथील वहाळात सापडला तरुणाचा मृतदेह

शेतमांगरात रात्री झोपायला गेलेल्या झोपायला गेलेल्या नारींग्रे बावकरवाडी येथील मंगेश शांताराम शिंदे(45) या तरुणाचा मृतदेह शेतमांगराजवळ असलेल्या वहाळाच्या पाण्यात सापडला. ही घटना मंगळवारी, सकाळी 7 वाजता घडली. नारींग्रे- बावकरवाडी येथील शांताराम बापू शिंदे यांची नारींग्रे सडा गायगोठण या भागात शेतजमीन असून तेथे मंगेश त्यांच्या 2 मुलांसोबत शेती करतात.

शेतजमिनीतच मंगेश शिंदे यांचा शेतमांगर आहे. मंगेश शांताराम शिंदे त्यांचा मुलगा नेहमी नारींग्रे सडा गायगोठण येथे असलेल्या त्यांच्या शेतमांगरात रात्री झोपायला जात असे. सोमवारी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे ते शेतमांगरामध्ये झोपण्यास गेले होते. त्यांचे वडील शांताराम बापू शिंदे हे मंगळवारी सकाळी 7 वा.सुमारास शेतमांगराकडे मुलासाठी चहा व नाश्ता घेऊन गेले. यावेळी तो शेतमांगरात दिसला नाही म्हणून मांगराजवळ असलेल्या वहाळाकडे गेला असेल म्हणून पाहण्यास गेले. त्यावेळी वहाळाच्या पाण्यात त्यांना मृतदेह दिसला. त्यांनी याबाबत तात्काळ गावातील ग्रामस्थांना सांगितले. ग्रामस्थांच्या सहकार्याने पाण्यातून त्याला बाहेर काढण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती शांताराम शिंदे यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम करीत आहेत.