क्यूआर कोडद्वारे करा चॅट ट्रान्सफर

व्हॉट्सअॅपने चॅट ट्रान्सफर फीचर लॉन्च केले आहे. याद्वारे वापरकर्ते क्यूआर कोड स्कॅन करून एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसवर सहजरीत्या चॅट ट्रान्सफर करू शकतील. दोन्ही फोन एकाच ऑपरेटिंग सिस्टमवर चालत असतील तरच हे फीचर काम करेल. सर्वप्रथम नवीन फोनमध्ये व्हॉट्सअॅप डाऊनलोड करा, तसेच दोन्ही फोनमध्ये वायफाय आणि लोकेशन चालू करा. आता दोन्ही फोनवर सेटिंग्जमध्ये चॅट ऑप्शनमध्ये जाऊन चॅट ट्रान्सफर पर्याय निवडा. यानंतर नवीन फोनमध्ये त्याच नंबरसह व्हॉट्सअॅपवर नोंदणी करा. आता क्यूआर आधारित चॅट ट्रान्सफरचा पर्याय दिसेल, ज्याद्वारे तुम्ही डेटा आणि मीडिया फाइल्स एका डिव्हाइसवरून दुसऱया डिव्हाइसवर ट्रान्सफर करू शकाल.