जालन्यातील घटना दुर्दैवी, शासनाच्या वतीने मी माफी मागतो! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

जालन्यातील घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांवर करण्यात आलेल्या अमानुष लाठीचार्जविरोधात मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे राज्यसरकारचे धाबे चांगलेच दणाणले. मराठा समाजाचा वाढता रोष लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात मराठा समाजाच्या आरक्षणाप्रकरणी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीबाबत माहिती दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात झालेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्यांची शासनाच्या वतीने माफी मागितली.द

देवेंद्र फडणवीस म्हणाले, जालन्यात उपोषण सुरू आहे, तिथे नुकतीच दुर्दैवी घटना झाली. पोलिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर करण्यात आला. खरं म्हणजे ही अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. अशा प्रकारचा बळाचा वापर करण्याचं समर्थन केलंच जाऊ शकत नाही.

यापूर्वी देखील मी पाच वर्ष गृहमंत्री होतो आणि आरक्षणासंदर्भातील जवळपास 2 हजार आंदोलनं त्याही काळात झाली परंतु कधीही आम्ही बळाचा उपयोग केला नाही आणि आताही त्याची गरज नव्हती. त्यामुळे सर्वप्रथम ज्या निष्पाप नागरिकांवर या बळाच्या वापरामुळे इजा झाली आहे, जे जखमी झालेले आहेत, त्यांच्या प्रति शासनाच्या वतीनं मी क्षमा याचना करतो, क्षमा मागतो, असेही फडणवीस म्हणाले.

‘बाहेर पडा बाहेर पडा; अजित पवार बाहेर पडा’, बारामतीत मराठा आंदोलकांच्या घोषणा

मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Lathicharge in Jalna – महाराष्ट्रात एक नाही तीन-तीन जनरल डायर, संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा

आज झालेल्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली. जालन्यात जे उपोषण सुरू आहे त्यातील मागण्यासंदर्भात देखील सखोल चर्चा करण्यात आली, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)