व्हरमाँट, न्यूयॉर्कमध्ये पूर;  स्विफ्ट बोटीने 50 जणांची सुटका केली

मुसळधार पावसाने सोमवारी अमेरिकेतील  ईशान्य भागात  अचानक पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.यात  रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पूर्व न्यूयॉर्क राज्यापासून बोस्टन आणि ईशान्येकडील वेस्टर्न मेनपर्यंत 13 दशलक्षाहून अधिक अमेरिकन पूरपरिस्थितीच्या प्रभावाखाली आहेत. न्यूयॉर्कच्या लागार्डिया आणि बोस्टनच्या लोगानसह संपूर्ण प्रदेशातील विमानतळांवर आणि तेथून 1,000 हून अधिक उड्डाणे सोमवारी पावसामुळे विलंबित किंवा रद्द झाली आहेत.

या पुरात न्यूयॉर्क आणि व्हरमाँट ही राज्ये सर्वाधिक प्रभावित झाली आहेत. रात्रभर आणि मंगळवारपर्यंत पाउस  वाढण्याची शक्यता होती. हवामानखात्याकडून असे सांगण्यात आले  आयरीन चक्रीवादळ हे उष्णकटिबंधीय वादळ म्हणून राज्यात पोहोचल्यामुले ही परिस्थिती निर्माण झाली आहे. व्हरमाँट आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रवक्ते मार्क बोस्मा यांनी सांगितले की, सुमारे 50  लोकांना स्विफ्ट बोटीने वाचवण्यात आले. बोस्मा म्हणाले, नागरिकांनी  अतिदक्ष राहावे आणि हवामानाचा  अंदाज घ्यावा.  शक्यतो घरातून बाहेर पडू नये. स्विफ्ट बोट क्रूने अँन्डोव्हरमधील सुमारे डझनभर कॅम्पर्सची सुटका केली, असे नगरपाल  जीनेट हाईट यांनी सांगितले.

न्यूयॉर्क शहराच्या ईशान्येस  ५० मैल अंतरावर असलेल्या स्टॉर्मविल या छोट्याशा शहरात रविवार ते सोमवार या कालावधीत ८ इंचांपेक्षा जास्त पाऊस पडला.