Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘5 ऑगस्ट’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Saturday, August 5, 2023)
लोखंडाच्या कढईत शिजवलेले अन्न खा. आजारपणातून लवकर बाहेर पडाल. पैशांची बचत करणे आवश्यक आहे. पैसे साठवण्याच्या पेटीत ताजी मोगऱ्याची फुले ठेवा. अपयशातून धडा घ्याल. आध्यात्मिक गुरुंच्या भेटीची ओढ लागेल. घरातील गरजेच्या वस्तू वेळीच आणाव्या लागतील.
शुभरंग : पिवळा

वृषभ (TAURUS – Saturday, August 5, 2023)
गुरु, शिक्षक आणि कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिंचा आदर करा. इतरांच्या आनंदात आनंद माना. हुशारीने गुंतवणूक कराल. कौटुंबिक स्नेहमेळावा साजरा करण्यात व्यस्त राहाल. घरात प्रसन्नतेचे वातावरण राहिल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मिळालेला रिकामा वेळ छंद जोपासण्यात व्यतित कराल. जोडीदाराकडून अनपेक्षितपणे भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.
शुभरंग : जांभळा

मिथुन (GEMINI – Saturday, August 5, 2023)
कुटुंबाच्या आनंदात वाढ होण्यासाठी पांढऱ्या फुलांचा गुच्छ घरात ठेवा. आरोग्य चांगले राहिल. प्रवास कटकटीचा होण्याची शक्यता आहे. लोकांकडून उधार घेतलेले पैसे वेळीच परत कराल. प्रिय व्यक्तिच्या कामकाजात हस्तक्षेप करू नका. कठोर परिश्रम आणि प्रयत्नांचे फळ चांगलेच मिळेल. प्रिय व्यक्ती तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करेल.
शुभरंग : चॉकलेटी

कर्क (CANCER -Saturday, August 5, 2023
तांब्याची चैन गळ्यात घाला. ताणतणावापासून आज मुक्त व्हाल. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस लाभदायक आहे. दररोज व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. अचानक प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. घरच्यांना वेळ द्याल. संकटात मित्रांची मदत मिळेल. सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम पाहाल. घरातील वाणसामानाची खरेदी कराल.
शुभरंग : राखाडी

सिंह (LEO – Saturday, August 5, 2023)
उगाचच मनोराज्यात रमू नका. इतरांनी आपले काम करावे, अशी अपेक्षा बाळगू नका. आवडत्या दागिन्यांची खरेदी कराल. गरजेच्या वेळी भावंडांचा पाठिंबा राहिल. दुसऱ्यांना पटवून देण्याच्या तुमच्यातील क्षमतेचा तुम्हाला लाभ होईल. खूप दिवसांपासून शोधत असलेले आवडीचे पुस्तक वाचण्यात दंग व्हाल.
शुभरंग : चॉकलेटी

कन्या (VIRGO – Saturday, August 5, 2023)
पाकिटात किंवा खिशात हिरव्या रंगाचा रुमाल ठेवा. व्यायामात सातत्या ठेवण्यासाठी प्रयत्न कराल. जुन्या मित्रांकडून आर्थिक मदतीची मागणी होऊ शकते. नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार मनात येईल. वरिष्ठांना गृहित धरू नका. इतरांचा विचार कराल. एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. ऑफिसच्या समस्या घरी घेऊन येऊ नका.
शुभरंग : मोती

तूळ (TULA- Saturday, August 5, 2023)
सूर्यस्नान करा. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. समाजात लोकप्रिय व्हाल. प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. स्वत:साठी वेळ काढाल. वेळेचा सुयोग्य वापर करा. घरात फिश टँक आणा त्यातील माशांना योग्य आहार खाऊ घाला. मानसिक स्वास्थ्याकरिता संगीतोपचाराची मदत घ्याल. प्रिय व्यक्तिकडून तुमचे कौतुक होईल.
शुभरंग : जांभळा

वृश्चिक ( SCORPIO – Saturday, August 5, 2023)
लाल रंगाच्या बाटलीमध्ये पाणी भरून ती उन्हात ठेवा आणि त्या बाटलीतील पाणी प्या. सकारात्मक दृष्टीकोन अवतीभवतीच्या लोकांना प्रसन्न करेल. जुन्या गुंतवणुकीतून उत्तम नफा मिळेल. इतरांवर प्रभाव पडेल. मैत्रीमधील चांगला काळ आठवा. नवी मैत्रीपूर्ण वाटचाल सुरू होईल. मेहनत आणि सहनशीलता यांचा आधार घेऊन उद्दिष्ट गाठाल. कार्यालयात आवडत्या कामाची जबाबदारी मिळेल. मन शांत राहिल.
शुभरंग : नारिंगी

धनु (SAGITTARIUS – Saturday, August 5, 2023)
शिवपिंडीवर अभिषेक करा. मित्रांचा आधार लाभेल. कुटुंबिय आनंद देतील. अर्थपुरवठ्याकरिता नवे आर्थिक करार कराल. मोकळ्या वेळेचा फायदा घ्या. कुटुंबियांसोबत प्रेमाचे क्षण अनुभवाल. कार्यालयीन कामात व्यस्त राहाल. व्यावसायिक संकल्पना अपयशी होणार नाही, याची काळजी घ्या.
शुभरंग : हिरवा

मकर ( CAPRICORN – Saturday, August 5, 2023)
मारुती स्तोत्र वाचा. समाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमांकरिता आजचा दिवस उत्तम आहे. मधुर आवाजाच्या व्यक्तिशी भेट होईल. प्रत्येकाच्या समस्या नीट ऐकून सोडवण्याचा प्रयत्न कराल. नकारात्मक विचार झटकून टाका. धार्मिक कार्याकरिता यथाशक्ती दान द्या. घरात शांतता राहिल.
शुभरंग : मोरपिसी

कुंभ (AQUARIUS – Saturday, August 5, 2023)
सोन्याची अंगठी बोटात घाला. मादक पदार्थांवर खर्च करू नका. घरातील सदस्यांच्या विविध अडचणींवर मात करून ध्येय गाठू शकाल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मौल्यवान वेळ वाया घालवू नका. तातडीचा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. संवाद साधताना मधुरावाणीचा उपयोग करा. चिंता करू नका.
शुभरंग : काळा

मीन (PISCES – Saturday, August 5, 2023)
कोणाचाही अनादर करू नका. आशादायी वातावरणाचा अनुभव घ्याल. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. आर्थिक सुरक्षितता मिळेल. घरात उत्साहाचे वातावरण राहील. घरात समारंभाचे आयोजन कराल. नातेवाईकाकडून आनंदाची बातमी कानी पडेल. लोकं तुमच्याकडून सल्ला मागतील. जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल. आवडता पोषाख परिधान कराल. सकारात्मक राहून जी कामे कराल त्यात यश मिळेल.
शुभरंग : केशरी