Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’29 जुलै’चे राशीभविष्य

मेष (ARIES – saturday, july 29, 2023)
दूध आणि दही एकत्र खाऊ नका. भूतकाळातील गोष्टींवर विचार करत बसू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. आनंदी व्यक्तिमत्त्व राहिल. ध्यान आणि योगाभ्यास याकडे लक्ष द्या. जोडीदारासोबत निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाल. प्रिय व्यक्तिची भेट होईल. मनाजोगी खरेदी कराल.
शुभरंग : निळा

वृषभ (TAURUS – saturday, july 29, 2023)
इतरांसोबत आनंदाचे क्षण वाटून घ्याल. प्रकृतीची काळजी घ्या. आज गुंतवणूक करणे टाळा. लोकांना दिलेली वचनं पाळायला शिका. जुन्या आठवणीत रमाल. आवडत्या व्यक्तिची भेट होईल. घरी एखादे धार्मिक कार्य पार पडण्याची शक्यता आहे. मैत्रिणीशी मनमोकळ्या गप्पा माराल. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : चॉकलेटी

मिथुन (GEMINI – saturday, july 29, 2023)
आर्थिक वाढ होईल. गणपतीला 21 दुर्वा वाहा. आजचा दिवस काही वेगळे करण्यासाठी थोडासा तरी दयाळूपणा दाखवा. मित्रमंडळींशी गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. गुंतवणूकीचे पर्याय निवडताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. प्राण्यांना दयाळूपणा दाखवा. इतरांसोबत आनंदाचे क्षण वाटून घ्याल.
शुभरंग : आकाशी

कर्क (CANCER – saturday, july 29, 2023)
आहारात वेलचीचा समावेश करा. सुदृढ आरोग्यासाठी आहारात सुकामेव्याचा समावेश करा. इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट द्याल. नवीन लोकं संपर्कात येतील. ज्ञानात भर पडेल. जोडीदाराकडून सुंदर भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत खरेदीला जाण्याचा आनंद घ्याल.
शुभरंग : लाल

सिंह (LEO – saturday, july 29, 2023)
आरोग्य चांगले राहिल. भांडखोर व्यक्तिशी वाद घालू नका. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरात शांतता नांदेल. सौंदर्य जपा. रिकामा वेळ आवडती कला जोपासण्यासाठी वापराल. जोडीदारासोबत प्रेमाचे भांडण होऊ शकते. घराबाहेर पडताना आईवडिलांचे आशीर्वाद घ्या. मनाजोगी खरेदी कराल.
शुभरंग : काळा

कन्या (VIRGO – saturday, july 29, 2023)
पायांच्या घोट्याला काळ्या रंगाचा धागा बांधा. कॉफीचे अतिसेवन टाळा. आर्थिक काटकसर करावी लागेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. घरातील भावंडांकडून मदत मिळेल. छंद जोपासायला वेळ द्या. कोणालाही दुखवू नका. जोडीदाराशी प्रेमाचे भांडण होईल. घरात सुख-समृद्धी आणि शांतता नांदेल.
शुभरंग : तांबडा

तूळ (TULA- saturday, july 29, 2023)
आरोग्य चांगले राहण्यासाठी उकडलेले चणे खा. घरात धार्मिक कार्य होईल. पालकांसोबत आनंद वाटून घ्या. प्रियजनांसोबत सहलीला जाण्याचा आनंद घ्या. सायंकाळी मनोरंजनाचा आनंद घ्याल. एकांतात राहावेसे वाटेल. आनंदातून छान सरप्राईझ मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा.
शुभरंग : केशरी

वृश्चिक ( SCORPIO – saturday, july 29, 2023)
पक्ष्यांना दाणे खाऊ घाला. करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानी स्पर्धेत भाग घ्याल. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी कानी येण्याची शक्यता आहे. अपयशातून धडे घ्याल. तुमच्या चुका तुमच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. योजना राबवण्यात अडचणी येतील. वर्तमानकाळात राहा. मेहनतीला यश येईल.
शुभरंग : नारिंगी

धनु (SAGITTARIUS – saturday, july 29, 2023)
मारुतीच्या मंदिरात बुंदीचा प्रसाद वाटा. कामाच्या सुटसुटीत वेळामुळे दिवसभरात विश्रांती घेण्यासाठी वेळ मिळेल. कोणाशीही वादविवाद घालू नका. प्रिय व्यक्तिची भेट होईल. एकांतात वेळ घालवावासा वाटेल. घरातील वातावरण सकारात्मक असेल. बालपणीच्या आठवणीत रमाल. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका.
शुभरंग : मोरपिसी

मकर ( CAPRICORN – saturday, july 29, 2023)
उघड्यावरचे अन्न सेवन करू नका. बोटात चांदीची अंगठी घाला. मुलांच्या नीरस आयुष्यात घटकाभर मोकळीक मिळेल. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तिची भेट होण्याचा संभव आहे. प्रिय व्यक्तिला वेळ द्याल. सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम पाहाल.
शुभरंग : राखाडी

कुंभ (AQUARIUS – saturday, july 29, 2023)
आरोग्याकडे लक्ष द्या. कुटुंबाच्या हितासाठी जास्तीची मेहनत करण्याची आवश्यकता आहे. हातची गेलेली संधी परत कधी मिळेल या विचाराने घाबरू नका. मन रिझवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदारासोबत भावनिक नाते घट्ट कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे.
शुभरंग : आकाशी

मीन (PISCES – saturday, july 29, 2023)
निळ्या रंगाचे कपडे परिधान करा. आरोग्य चांगले राहिल. दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. नातेवाईक आणि जवळच्या मित्रमंडळींकडून आनंदाची बातमी समजेल. प्रेम प्रकरणाचा दिंडोरा पिटवू नका. स्वत:ला व्यस्त ठेवाल. कामे टाळू नका. रिकाम्या वेळात आवडता सिनेमा पाहायला जाल.
शुभरंग : पांढरा