IPL 2024 – गुजरातच्या संघात नवा योद्धा

आयपीएल सुरू होण्यापूर्वीच दुखापतीमुळे अनेक खेळाडू स्पर्धेबाहेर फेकले जात आहेत तर त्यांची जागा नवनव्या तरुणांना मिळतेय. हिंदुस्थानच्या गोलंदाजीचा खराखुरा योद्धा असलेल्या मोहम्मद शमीला दुखापतीमुळे आयपीएलला मुकावे लागतेय. आता त्याच्या जागी नव्या दमाच्या वेगवान गोलंदाज संदीप वॉरियरची निवड करण्यात आली आहे. गुजरात टायटन्सने आज आपल्या या बदलाची घोषणा करत नव्या गोलंदाजाला आजमावणार असल्याचे संकेत दिले.

गुजरात टायटन्सकडून सर्वाधिक 48 विकेट घेणाऱया शमीच्या टाचेवर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या तो दुखापतीतून सावरत असून त्याला पूर्णपणे सावरण्यासाठी काही काळ लागणार आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सने संदीप वॉरियरला घेण्याचा निर्णय घेतला. संदीप आतापर्यंत पाच आयपीएल सामने खेळला असून तो 50 लाखांच्या बेस प्राइसमध्ये गुजरात टायटन्समध्ये सामील होईल. तामीळनाडूचा डावखुरा वेगवान गोलंदाज वॉरियरने विजय हजारे करंडक स्पर्धेत चांगली कामगिरी करत 5 सामन्यांत 11 विकेट घेतले आहेत. गुजरात टायटन्स 24 मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्याने आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.

चेन्नई-बंगळुरू लढतीने आयपीएलचा धमाका, महेंद्रसिंग धोनी अन् विराट कोहली लढतीचे मुख्य आकर्षण