‘फर्जी’ वेबसिरीज पाहून घरातच बनवल्या ‘फर्जी’ नोटा

पैशांच्या हव्यासापाई माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशा अनेक घटना जगभरात घडत असतात. अशीच एक घटना हैदराबाधमध्ये घडली आहे. “फर्जी” ही वेबसीरीज पाहून प्रेरीत झालेल्या एका व्यक्तीने घरामध्ये बनावट नोटा छापल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 500 रुपयांच्या 810 बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

वनम लक्ष्मीनारायण असे आरोपीचे नाव आहे. “फर्जी’ ही वेबसीरीज पाहून तो प्रेरीत झाला आणि त्याने घरामध्येत स्क्रिन प्रिंटर, ग्रीन फॉइल पेपर, जेके एक्सेल बॉण्ड पेपर्स, कटर आणि ग्रीन फॉइल पेपरसाठी लॅमिनेशन मशीनच्या सहाय्याने बनावट नोटा छापल्या होत्या. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्याचा साथीदार एरुकला प्रणय कुमार याला फळ आणि भाजी मंडईतून 20,000 रुपयांच्या बनावट नोटांसह पकडले. तसेच वनम हा बनावट सोने गहाण ठेवून लोकांची फसवणूक करत असल्याची माहिती सुद्धा तपासात उघड झाली. तसेच 2023 मध्ये त्याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्याच्या कुटुंबीयांना वमनच्या कृत्याबद्दल माहिती नव्हती.

बालानगर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी साफळ रचना आणि अल्लापूर पोलिसांच्या मदतीने शनिवारी 3 फेब्रुवारी रोजी बनवाट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आणि त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 810 बनवाट नोटा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.