सरकारी कर्मचाऱ्याला शिवीगाळ म्हणजे कामकाजात अडथळा नव्हे! सत्र न्यायालयाचा महत्पूवर्ण निर्वाळा

सरकारी कर्मचाऱ्याला केवळ शिवीगाळ करणे हा शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा सत्र न्यायालयाने दिला. याप्रकरणी न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी दोन्ही आरोपींना निर्दोष सोडले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. पी. मेहता यांनी हा निर्णय दिला.

वांद्रे आरपीएफमध्ये कॉन्स्टेबल असलेले नंदलाल शर्मा क त्यांचे सहकारी जुबेर शेख हे दोघे सांताक्रुज रेल्वे स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्याचदरम्यान धर्मेंद्र सिंग आणि संजय दुबे हे दोघे स्थानिक रहिवासी रेल्वे तिकीट खिडकीवरील प्रवाशांना निष्कारण त्रास देत असल्याचे आढळले. जवानांनी तेथे जाऊन दोघांना हटकले असता त्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी नंदलाल शर्मा यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सिंग क दुबे या दोघांकिरुद्ध गुन्हा दाखल केला होता.