अहमदाबादच्या 23 शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी

अहमदाबादमध्ये 23 शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाल्याने पोलिसांनी एकच तारांबळ उडाली. तपासणीत कुठल्याही प्रकारची स्पह्टके किंवा बॉम्ब सापडला नाही. त्यानंतर सर्वांचा जीव भांडय़ात पडला.

शाळांना तौहीद वॉरियरच्या नावाने ईमेल पाठवण्यात आला होता. जिहादी संपूर्ण शहरात पसरले असून मोठा हल्ला करण्याची तयारी करत आहेत. जे आमच्याविरोधात जातील त्या सर्वांना मारून टाकण्यासाठी तौहीदचे लढवय्ये तयार आहेत. गुजरातमध्ये शरिया कायदा लागू करणे हेच आमचे लक्ष्य असून आम्हाला शरण या किंवा मरा अशी धमकी ईमेलमध्ये देण्यात आली होती. दरम्यान, धमकीचा इमेल कोणत्या सर्व्हरवरून याचा तपास सध्या सुरू आहे.