नितीन देसाई आत्महत्या प्रकरण, ईसीएल फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुप व्यवस्थापकीय संचालकांना पोलिसांची नोटीस  

प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी केलेल्या तक्रारीवरून ईसीएल फायनान्स पंपनी, एडलवाईज ग्रुपच्या पाच पदाधिकाऱयांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुह्याचा तपास रायगड पोलिसांनी सुरू केला असून ईसीएल फायनान्स पंपनी, एडलवाईज ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक यांना नोटीस देऊन नितीन देसाई यांना देण्यात आलेले कर्ज व वसुली तसेच इतर मुद्दय़ांच्या तपासासाठी मंगळवार, 8 ऑगस्ट सकाळी 11 वाजेपर्यंत खालापूर पोलीस ठाण्यात हजर राहून माहिती सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच सदर गुह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी आत्तापर्यंत 15 साक्षीदारांकडे विचारपूस करून त्यांचे जबाब नोंदविले आहेत.

प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी मंगळवारी मध्यरात्री आपल्या कर्जत येथील एन. डी. स्टुडिओ येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नितीन देसाई यांनी काही कारणांनी वित्तीय संस्थेकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. 2016 आणि 2018 अशा वेगवेगळय़ा दोन वर्षात कर्जाचा करारनामा झाला होता. या कर्जाची परतफेड न केल्याने कर्ज सुमारे 250 कोटी रुपयांवर पोहचले होते. त्यामुळे ईसीएल फायनान्स पंपनी, एडलवाईज ग्रुप पंपनीच्या पदाधिकाऱयांनी त्यांच्याकडे कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावला होता.

नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉईस रेकॉर्ड क्लिप तयार केल्या होत्या. या क्लिपमध्ये फायनान्स पंपन्यांच्या पदाधिकाऱयांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल उल्लेख केला आहे. त्यातच शुक्रवारी देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी ईसीएल फायनान्स पंपनी आणि एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी यांनी कर्ज प्रकरणामध्ये वारंवार तगादा लावून मानसिक त्रास दिला. त्या मानसिक त्रासाला पंटाळून नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे, अशी लेखी तक्रार खालापूर पोलिसांकडे दिली. त्यानुसार पोलिसांनी ईसीएल फायनान्स पंपनी आणि एडलवाईज ग्रुपच्या केयूर मेहता, रशेष शहा, स्मित शहा, आर. के. बन्सल, जितेंद्र कोठारी या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


z एन. डी. स्टुडिओचे कायदेशीर सल्लागार, आर्थिक सल्लागार व अकाउंटंट यांच्याकडून सदर कर्ज प्रकरणाबाबत पोलीस माहिती घेत आहेत. आत्तापर्यंत गुह्याच्या अनुषंगाने 15 साक्षीदारांकडे विचारपूस करून त्यांचे जबाब नोंदविण्यात आहेत.