मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन खोतकर-जानकर उपोषणस्थळी; पाहा काय म्हणाले जरांगे

मराठा आरक्षणावर उपसमितीच्या बैठकीत तोडगा निघाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर आणि महादेव जानकर यांनी मनोज जरांगे यांची उपोषणस्थळी भेट घेतली. यावेळी ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी तेथे पोहोचले.

उपोषणस्थळी या तिघांमध्ये काही चर्चा झाली. तसेच सरकारचं एक पत्र यावेळी अर्जुन खोतकर यांनी जरांगे यांना दाखवलं. हे पत्र म्हणजे मसूदा होता. त्यात काही बदल, सूचना जरांगे यांनी त्यांना केल्या.

चर्चेदरम्यान, जरांगे यांनी त्यांना आवाहन केलं की, ‘मी पाणी पितो, तुम्ही आरक्षण जाहीर झाल्याचा जीआर घेऊन या’.

दरम्यान, उपसमितीच्या बैठकीनंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन बैठकीतला निर्णय जाहीर करणार आहेत.