कोपरगाव तालुक्यात दारू अड्ड्यावर छापा, 50 हजार रुपयांची 700 लिटर दारू जप्त

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील भागात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या दोन गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर येथील तालुका पोलिसांनी छापा टाकून 700 लिटर दारू 42 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी दत्तु जानु पिंपळे व महिला आरोपी नामे मंदाबाई दादा काळे रा. सुरेगाव याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तू पिंगळे हा सुरेगाव भागात गावठी हातभट्टीची दारू गाळून साठा केला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन दारूचा अड्डाच उद्धवस्त केला. या छाप्यात कॅनमधील 600 लिटर व 42 हजार रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू जप्त केली.तसेच मंदा काळे हिच्या कडून कॅनमधील 100 लिटर व 10 हजार रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू जप्त केली.

प्लास्टिकच्या टाक्या, गूळ नवसागरमिश्रित तयार केलेले कुजके रसायन, टाक्या व इतर साहित्य ही पोलिसांनी हस्तगत केले. या कारवाईने सुरेगाव भागात छुप्या पद्धतीने गावठी हातभट्टीचा बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोकों, अविनाश अशोक समनर व महिला पो. कॉ. ज्योती दिलीप राहणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहमदनगर, स्वाती भोर अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांची सूचना आणि मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश कुमार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन वांडेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गागरे, पोलीस अविनाश तमनर, म.पो. कॉ. ज्योती राहणे, पोकों किसन सानप, पोना रामचंद्र साळुंके यांनी केलेली आहे.