Photo – पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील निती टेलरच्या लूकने वेधले लक्ष, फोटोशूट व्हायरल

‘बडे अच्छे लगते हैं सीजन 2’ ची अभिनेत्री निती टेलर सध्या चर्चेत आली आहे. तिने नुकतेच इंस्टाग्रामवर फोटो टाकले आहेत आणि त्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. निती टेलरने आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वाने आणि फॅशन सेन्सने अनेकवेळा चाहत्यांची मने जिंकली आहेत. निती टेलर देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि 1.9 दशलक्षाहून अधिक लोक तिला फॉलो करतात.

निती टेलरने पिवळ्या रंगाचा मिनी ड्रेस घालून काही फोटो इंस्चाग्रामवर शेअर केले आहेत.

आपले लूक पूर्ण करण्यासाठी तिने पिवळ्या रंगाच्या ड्रेसवर गुलाबी रंगाची लिपस्टिक आणि गालावर ब्लश लावले आहे.

तसेच पिवळे हूप कानातले आणि हातात मण्यांचे ब्रेसलेट घातले आहे.

चाहत्यांनाही तिचे हे फोटो आवडले असून त्यात ती खूप सुंदर दिसत आहे.

तिने आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी चेहऱ्यावर हलका मेकअप केला असून केसांना कर्ल केले आहे.