सात्त्विक-चिराग जोडीची झेप

सात्त्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या हिंदुस्थानच्या स्टार जोडीने जागतिक क्रमवारीत मंगळवारी कारकीर्दीतील सर्वोत्तम दुसऱ्या स्थानी झेप घेतली. याआधी या जोडीने पुरुष दुहेरीत तिसरे स्थान मिळविले होते.

गतवर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक, फ्रोंच ओपन सुपर 750 किताब व यंदाच्या वर्षी इंडोनेशिया ओपन आणि स्विस ओपन 300 असे किताब जिंकणाऱया सात्त्विक-चिरागचे आता 87211 गुण झाले आहेत. कोरिया ओपनमध्ये इंडोनेशियाच्या जोडीवरही हिंदुस्थानी जोडीने विजय मिळविला होता.

सिंधू 17 व्या, तर प्रणॉय 10 व्या स्थानी कायम

महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू 17 व्या स्थानी कायम आहे. महिला दुहेरीत त्रिशा जॉली व गायत्री गोपीचंद ही जोडी 19 व्या स्थानी कायम आहे. पुरुष एकेरीत एच.एस. प्रणॉय दहाव्या स्थानी कायम आहे.