बराच वेळ एकाच जागी बसल्याने वाढू शकतो ‘या’ आजारांचा धोका, तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला

बहुतांश लोकांना एकाच जागी बसून काम करण्याची सवय असते. तासन् तास घर किंवा कार्यालयात नियमित बैठी कामे करणे हा बऱ्याच जणांच्या जीवनशैलीचा भाग बनला आहे. असे केल्याने शारीरिक समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. जाणून घेऊया, बराच वेळ एकाच जागी बसल्याने कोणत्या आजारांचा धोका वाढू शकतो.

ऑफिस डेस्कवर बसून बराच वेळ काम करणे, घरी खूप वेळ बसून टीव्ही बघणे किंवा इतर ठिकाणी तासन् तास बसणे यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. ज्याप्रमाणे धूम्रपान, जंक फूड, दारूचे अतिसेवन शरीरासाठी घातक असते, त्याचप्रमाणे एकाच जागी तासन् तास बसून काम करणे यामुळे शारीरिक तक्रारी उद्भवू शकतात.

शरीरातील कॅलरींची कमतरता, हाडे ठिसूळ होणे आणि पेशी कमजोर होणे असे त्रास कोणतीही हालचाल न करता बराच वेळ एकाच जागी बसून राहिल्याने होऊ शकतात. त्याचप्रमाणे काही जुनाट आजारांसाठीही धोक्याचे ठरू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती सतत एकाच जागी बसून राहते. तेव्हा रक्ताभिसरण आणि रक्तदाब या दोन्हींवर परिणाम होतो. आरोग्याच्या इतरही तक्रारींमध्ये वाढ होऊ शकते.

दैनंदिन जीवनात हळूहळू बदल होत आहेत. बरेचसे लोक एकाच ठिकाणी बसून काम करतात किंवा एकाच जागी बसून जास्त वेळ घालवतात. बैठी जीवनशैली ही बऱ्याचशा लोकांसाठी सामान्य झाली आहे. अनेक लोक डेस्कवर, स्क्रीनसमोर दीर्घकाळ वेळ घालवताना दिसतात. जर कोणी असे केले, तर ते धूम्रपान करण्यासारखे धोकादायक आहे. त्यामुळे जास्त बसण्याने हृदयाचे विकार वाढण्याची शक्यता असते.

एथेरोस्क्लेरोसिसचा धोका
एकाच जागी खूप वेळ बसल्याने रक्ताभिसरणाचा धोका निर्माण होतो. त्यामुळे शरीरात फॅट जमा होतो. फॅट बर्न होण्याची कार्यक्षमता एकाच जागी बसल्यामुळे कमी होते.

रक्ताभिसरणात बिघाड
जास्त वेळ बसल्यामुळे रक्ताभिसरण होण्यास अडचण उद्भवल्यामुळे ह्रदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. यावर मात करण्यासाठी व्यायामाची आवश्यकता आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनशैलीत व्यायामासाठी किमान वेळ काढावा.

उच्च रक्तदाब
बराच वेळ एका जागी बसून राहिल्याने शारीरिक हालचाल आणि रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. ह्रदयविकाराचा त्रास यामुळे उद्भवू शकतो. याकरिता दररोज व्यायाम आणि बराच वेळ बसून राहण्याची सवय सोडणे आवश्यक आहे. रक्तदाबाचा धोका टाळण्यासाठी आणि ह्रदयविकारावर मात करण्यासाठी या दोन गोष्टींची आवश्यकता आहे.

लठ्ठपणाचा धोका वाढतो
बराच वेळ बसून राहण्याच्या जीवनशैलीमुळे वजन वाढते. यामुळे लठ्ठपणाचा त्रास उद्भवू शकतो. वजन वाढल्यामुळे ह्रदयावर दाब येतो. यामुळे ह्रदय विकार, उच्च कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाचा धोका वाढतो. बसण्याची सवय कमी करण्यासाठी दररोज व्यायाम, वजन वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

आजारपणाचा धोका टाळण्यासाठी करा ‘ही’ कामे –
पायी चालणे
तुम्ही बराच वेळ एका जागी बसून काम करत असाल, तर थोड्या थोड्या वेळाने चाला.यामुळे शारीरिक हालचाल होत राहिल.

उभे राहून काम करणे
बसून काम करत असाल, तर अधूनमधून उभे राहा. उभे राहून जी कामे करणे शक्य आहे अशी काम उभ्याने करा. यामुळे स्नायूंमधील चपळता टिकून राहायला मदत होईल आणि रक्ताभिसरण वाढेल.

शारीरिक हालचाली वाढवा
दुपारी जेवणानंतर शारीरिक हालचालींमध्ये वाढ करा. चालणे, फिरणे, जीने चढणे आणि उतरणे यामध्ये वाढ करा.

व्यायाम करा
आठवड्याला कमीत कमी 15 मिनिटे तरी व्यायाम करा. याव्यतिरिक्त कार्डियो व्यायामही अवश्य करा.