फुकटय़ा प्रवाशांकडून 21 कोटींची दंड वसुली  

मुंबई उपनगरीय रेल्वेतून तिकिटाशिवाय प्रवास करणाऱया 2.94 लाख फुकटय़ा प्रवाशांवर कारवाई करत पश्चिम रेल्वेने 20.84 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. एप्रिल महिन्यातील ही आकडेवारी आहे. सर्वाधिक म्हणजे 98 हजार फुकटे प्रवासी उपनगरात आढळले असून त्यांच्याकडून 5.57 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. याच कालावधीत एसी लोकलमधून फुकटात गारेगार प्रवास करणाऱया 4 हजार प्रवाशांवर कारवाई करत 13.71 लाख रुपयांचा महसूल मिळाला.