यवतमाळमधील नरेंद्र मोदींच्या सभेतील खुर्च्य़ांवर राहुल गांधींचे फोटो

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ मध्ये आज दुपारी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. मात्र सभास्थळी चक्क काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांचे फोटो खुर्चीवर लावलेले असल्याने नेमकी सभा कुणाची असा सवाल उपस्थित केला जात आहे.यामुळे चर्चेला एकच उधाण आले आहे.

‘आमचा लढा 138 वर्षांचा’ असं या खुर्च्यांवर लिहिण्यात आले आहे. तसेच यावर स्कॅन केलेला लोगो पण आहे. असंही सांगितले जातंय की, खासदार राहुल यांची नागपूर येथे सभा झाली. त्याच कंत्राटदाराने या खुर्च्या पुरविल्या आहेत आणि त्यावरील पोस्टर न काढता नजरचूकीने त्या खुर्च्या पाठवण्यात आल्या आहेत. पण या घटनेमुळे मात्र चर्चेचे पेव फुटले आहेत.