‘चांदतारा’ चमकला; राज्य हौशी नाटय़ स्पर्धेची रंगत

62 व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाटय़ स्पर्धा, मुंबई 2 केंद्रातून विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या ‘चांदतारा’ या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले. पोलीस कल्याण केंद्र, मुंबई या संस्थेच्या ‘एकेक पान गळावया’ या नाटकास द्वितीय पारितोषिक मिळाले. दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पर्धेचा निकाल जाहीर केला. मुंबई 2 केंद्रातून महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड संस्थेच्या घायाळ नाटकाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक सुनील कदम (नाटक- ‘एकेक पान गळावया’) आणि द्वितीय पारितोषिक रमाकांत जाधव (नाटक- ‘चांदतारा’) यांना मिळाले. ही स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत यशवंत नाटय़ मंदिर, माटुंगा येथे पार पडली. स्पर्धेत 17 नाटय़ प्रयोग सादर झाले. वसंत सामदेकर, ईश्वर जगताप, प्राची गडकरी हे परीक्षक होते.