सिनेमा : रेल गाडी, रेल गाडी…

>> प्रा. अनिल कवठेकर

‘रेल गाडी रेल गाडी झुक झुक…’ हे रेल्वेवर असणारे गाणे पहिले रॅप साँग असे मानले जाते. चित्रपटाची गाणी, चित्रपटाचे टायटल, क्लायमॅक्स, एवढेच नाही तर ट्रेनमध्ये पूर्णपणे काही गाणी शूट केलेली आहेत. ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

जगातील सर्वोत्कृष्ट पीन प्ले म्हणून सत्यजित रे यांच्या ‘पथेर पांचाली’चा उल्लेख केला जातो. या चित्रपटात ट्रेन पाहायला धावणाऱया मुलांचे दृश्य आहे आणि ते दृश्य अनेक समीक्षकांनी गौरवलेले आहे. मधल्या काळात रॅप सॉंगचा जमाना आला होता. पण 1968 मध्ये अशोक कुमार यांच्या ‘आशीर्वाद’ या चित्रपटात ‘रेल गाडी रेल गाडी झुक झुक झुक झुक…’ हे गाणे पहिले रॅप साँग असल्याचे मानले जाते.

चित्रपटाची गाणी, त्याचे टायटल, क्लायमॅक्स, एवढंच नाही तर ट्रेनमध्ये पूर्णपणे काही गाणी शूट झी आहेत. त्यापैकी सगळ्यांना आवडणारं गाणं म्हणजे ‘मेरे सपनो की रानी कब आएगी तू…’ दार्जिलिंगवरून निघालेली ट्रेन आणि त्यासोबत जाणारा रस्ता आणि रस्त्याभोवती असा अत्यंत देखणा निसर्ग, सोबत त्या काळचा रोमँटिक हीरो राजेश खन्ना उघड्या जीपमधून चाललेला आहे आणि प्रत्येक तरुणाच्या मनात असणारी त्याची स्वप्नसुंदरी कशी असावी, ती कशी भेटावी हे सांगणारं हे गाणं स्टाईलमध्ये गात आहे. ज्या टॉय ट्रेनला ‘वर्ल्ड हेरिटेज’चा दर्जा प्राप्त झाला, त्या ट्रेनमध्ये शर्मिला टागोर बसलेली आहे. राजेश खन्ना आणि ट्रेनचे आणखी एक गाणे जे मालगाडीमध्ये आहे, चित्रपटाचे नाव ‘अजनबी.’ त्याच्यासोबत नायिका होती झीनत अमान आणि गाणं होतं, ‘हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले…’

‘आप की कसम’मधां जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं अजून एक गाणं. आयुष्यात आपण नेमकं कसं वागायला हवं, हे शहाणपण बऱयाच उशिरा आाsाा नायक राजेश खन्नाचा प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधला प्रवास, खिडकीतून दिसणारं विश्व, रिकामे प्लॅटफॉर्म, शेत, मंदिर, देऊळ, सूर्योदय, सूर्यास्त… सगळंच आपल्याला दिसत जातं, जे त्याच्या दृष्टीने आता अर्थहीन आहे. मला वाटतं, सर्वाधिक ट्रेनशी संबंधित गाणी राजेश खन्नालाच मिळाली असावीत. कारण त्याचा ‘द ट्रेन’ नावाचा संपूर्ण ट्रेनशी संबंधित असणारा चित्रपट हिट होता.

ट्रेनचा प्रवास येथेच थांबत नाही, तर 1998 मध्ये शाहरुख खानच्या ‘दिल से’मधां सुखविंदर सिंगने गायलेलं ‘चल छैय्या छैय्या छैय्या…’ हे गाणं तर पूर्णपणे रेल्वेच्या टपावर नाचताना शूट करण्यात आां होतं. हीसुद्धा दिग्दर्शकाची, काकारांची आणि कोरिओग्राफरची कमालच होती. ते गाणं खूप गाजलं होतं. ‘हनीमून’ नावाच्या चित्रपटात ट्रेनमधून नवीन निश्चल आणि लीना चंदावरकर हनीमूनला निघालेले आहेत आणि त्याच ट्रेनमध्ये कॉलेजची मुलं सहलीला चाललेली आहेत. ती मुलं जे गाणं म्हणतात ते पूर्णपणे ट्रेनमध्येच शूट करण्यात आलेलं होतं. ‘जीवन है एक सपना मधुर सुहाना सपना…’ ऋषी कपूरच्या ‘रफू चक्कर’मध्ये त्याने स्त्राr वेशात सादर केलेलं पूर्ण गाणं ट्रेनमध्ये शूट करण्यात आलं होतं. गाण्याचे बोल होते, ‘छूक छूक छक छक, बॉम्बे से बरोडा तक…’

आपल्या गाण्यातील शब्दांबाबत चोखंदळ असणारा देव आनंदही याबाबतीत कसा मागे राहील? त्याच्या ‘प्रेमपुजारी’मधां ‘फों के रंग से दिल की कलम से…’ हे गाणं स्वित्झर्लंडमधील ट्रेनमध्ये शूट करण्यात आलेलं होतं. त्या ट्रेनमधून दिसणारा बाहेरचा निसर्ग आणि गीताच्या सदाबहार शब्दांमुळे त्या गाण्याची लज्जत वाढवणारी होती. देव आनंदचे आणखी एक ट्रेनमधील गाणं म्हणजे ‘काला बाजार!’ सुंदर चेहऱयाच्या वहिदा रहमानकडे पाहून देव आनंद गाणं गातोय, ‘अपनी तो हर आह एक तुफान है…’

या ट्रेन प्रवासात अमिताभ बच्चन मागे नाहीत. त्यांच्याकरिता तर एक चित्रपटच प्लॅटफॉर्मवर निर्माण झा होता. तो चित्रपट होता ‘कुली’ आणि त्यातां गाणं होतं ‘सारी दुनिया का बोझ हम उठाते है…’
‘अमर अकबर अँथनी’मध्ये एका गाण्यात टॉय ट्रेन वापरली आहे. अमर आपल्या घराच्या अंगणात बसून गाणं गातोय, ‘दिल मे दिलबर तू रहता है’ आणि अँथनी समुद्रात मोटर बोटीवर गाण्याचे तेच बोल गात आहे, तर अकबरही तेच गाणं गात टॉय ट्रेनमध्ये आहे. म्हणजे इथे ट्रेन धम्माल मस्तीसाठी वापरण्यात आली आहे.

संजय दत्तच्या ‘लक’मध्ये जिवाचा थरकाप उडवणारे ट्रेनचे दृश्य दाखवण्यात आले होते. पाच जणांना एका लोखंडी पिंजऱयामध्ये बंद करून तो पिंजरा रुळांवर ठेवण्यात आलेला होता. प्रत्यक्षात तो साईडला होता. त्यांचे हात बांधलेले व डोळ्यांवर पट्टी होती तसंच सहा-सात रेल्वे ट्रक्स… त्या ट्रक्सवरून ट्रेन चाललेल्या आहेत आणि हे पाच जण अंदाजाने रेल्वे ट्रक ाढा@स करत आहेत. एक-एक करत सर्व गुंड ट्रेनने उडवले जातात. संजय दत्त नायक असल्यामुळे तो सहीसलामत ट्रेनच्या अपघातातून वाचतो. पण ते दृश्य मनावर जबरदस्त परिणाम साधतं. अजय देवगनच्या ‘सुलतान’मध्ये रेल्वे ाढा@सिंगच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे ट्रकला जायला रस्ता नसतो. म्हणून तो रेल्वेचे 15-15 फुटांचे दोन रूळ बाजूला करून आपला ट्रक रेल्वे ट्रकवरून ाढा@स करतो. इतक्यात ट्रेन येते. ती ट्रेन येईपर्यंत पुन्हा ते दोन्ही 15-15 फुटांचे काढलेले रूळ जोडण्याचा प्रयत्न करतो. असे एक चमत्कृतीपूर्ण दृश्य पाहायला मिळते. हीरोची इमेज प्रचंड मोठी करण्याकरिता अशी दृश्यं नेहमीच उपयोगी पडतात. ते भौतिकशास्त्रदृष्ट्या योग्य की अयोग्य? असा विचार करणं त्या क्षणी तरी आपल्याला सुचत नाही. ‘कच्चे धागे’मध्ये अजय देवगन आणि सैफ अली खानचा मालगाडीवरचा जवळ जवळ दहा मिनिटांचा सीन आहे. दोघांच्या हातांत बेड्या आहेत आणि त्यांना साखळदंडाने बांधलेले आहे. अजय देवगन आणि सैफला त्यांची मैत्रीण सांगते की, ट्रेनचा ड्रायव्हर मृत्यू पावलेला आहे. म्हणून तो गार्डचा डबा मुख्य ट्रेनपासून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करतो असा तो सीन आहे. अशी दृश्यं वारंवार पाहताना हे लक्षात येतं की, वेगवेगळ्या अँगलने अनेक प्रकारे ट्रेन चित्रपटात आली आहे व त्यावरील दृश्यं खूप परिणामकारक बनली आहेत.

चित्रपटांची ही कहाणी कमल हसनच्या अभिनयाला स्पर्श केल्याशिवाय पूर्ण होत नाही. ‘सदमा’मधा शेवटचा कायमॅक्मस सीन. कमल हसना अपघात झालेला आहे, रश्मी ट्रेनमध्ये बसून निघालेली आहे. ती आता सदम्यातून सावरी आहे. ती त्याला ओळखत नाही. अपघातामुळे कमल हसनचे कपडे मळके व पाय वाकडा झालेला आहे. तो तिला हरप्रकारे आठवण करून देतो.माकडासारखा अभिनय करतो. पण तिला तो भिकारी, लाचार वाटतो. ती त्याला खायला देते. कमल तिला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण ट्रेन हळूहळू पुढे जात आहे. कमलचं सांगण्याचे, समजावण्याचे प्रयत्न थिटे पडत आहेत. ती आपल्याला सोडून चाल्याचं कारुण्य, भय त्याच्या डोळ्यात दिसतं. त्याचा उच्च कोटीचा अभिनय पाहताना जिवाचा थरकाप होतो आणि आपल्या डोळ्यातून अश्रू वाहू ाागतात. तो सीन पाहताना मनाला यातना होतात. श्रीदेवीने तिच्या चेहऱयावर दाखवलेले अनोळखी भावही तितकेच तोडीस तोड होते.

शेवटी जीवन म्हणजे येणं आणि जाणं. हा एक प्रवास आहे आणि हा प्रवास असाच निरंतर पुढे चालत राहील.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)