हॉलीवूडची सूपरमॉडेल गिगी हदीदला अटक, बॅगेत गांजा ठेऊन करत होती प्रवास

अमेरीकेची सुपर मॉडेल गिगी हदीद हिच्याकडे गांजा सापडल्याने तिला अटक करण्यात आली आहे. ती मैत्रिणीसोबत केमॅन आयलॅण्डवर गेली होती. नंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

वृत्तानुसार, गिगी हदीद (27) ही अमेरीकेतील सुपर मॉडेल आहे. ती 10 जुलै रोजी तिला केमॅन आयलॅण्डच्या ओवन रॉर्बर्ट्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केले होते. गिगी तिची मैत्रीण निकोल मॅक्कार्थी सोबत खासगी प्लेनने प्रवास करत होती. तपासादरम्यान गिगीच्या बॅगेत गांजा सापडला. नंतर कळले की ते गांजा त्यांनी स्वत:साठी आणले होते. एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गिगी आणि तिच्या मैत्रीणीला अटक करण्यात आली आहे. याची माहिती मिळाल्यानंतर लोकल आऊटलेट केमॅन मार्ल रोड ने दिली आहे.

गिगी हदीद आणि तिच्या मैत्रीणीला त्यांच्या वापरासाठी गांजा आणि साहित्य आणल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. तेथून त्यांना प्रिजनर डिटेन्शन सेंटरमध्ये आणण्यात आले तेथून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. दोन दिवसांनंतर, 12 जुलै रोजी, दोन्ही न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले आणि त्यांना हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला. त्यांच्यावर कोणतेही आरोप ठेवण्यात आलेले नाहीत. गिगी हदीदने वैद्यकीय परवान्याअंतर्गत न्यूयॉर्कमधून गांजा खरेदी केला होता. गिगीच्या टीमने ई न्यूजला ही माहिती दिली आहे. 2017 पासून ग्रँड केमनमध्ये वापरणे देखील कायदेशीर आहे. त्याच्या नोंदी साफ झाल्या आहेत.