महिला उद्योजकांचा नेटवर्किंग मंच, ‘दि विमेन्स सर्कल’ व्यासपीठाचा शुभारंभ

उद्योजकतेच्या क्षेत्रात वावरताना महिलांना त्यांचे आयुष्य जगण्यासाठी विरंगुळ्याचे चार क्षण मिळावेत, यासाठी ‘दि विमेन्स सर्कल’ या व्यासपीठाचा शुभारंभ रसिका जोशी-फेणे यांनी केला आहे.

महिला उद्योजकांना एकत्र आणणे हे ‘दि विमेन्स सर्कल’चे प्रमुख ध्येय आहे. अलीकडेच दि विमेन्स सर्कलने टीडब्ल्यूसी या बिझनेस कॉन्क्लेव्हचे आयोजन केले होते. यात 100हून अधिक महिला उद्योजक सहभागी झाल्या. उद्योग क्षेत्रात स्वत:चा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

अनुजा नाडकर्णी – क्रिएटिव्ह आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर, चारुल माहेश्वरी – वर्षातील सर्वोत्कृष्ट मायक्रो बिझनेस, शिवानी चौधरी – यंग अचिव्हर ऑफ द इयर, शिल्पा रिसबूड – इनोव्हेशन आंत्रप्रेन्योर ऑफ द इयरमधील पायोनियर, संस्कृती पंड्या – उद्योजक ऑफ द इयर (उत्पादन), रिमा पारीख – उद्योजक (सेवा), डॉ. रिद्धी राठी – सीईओ ऑफ द इयर, अशनीत कौर आनंद – एंटरप्राइजिंग स्टार्ट अप ऑफ द इयर आणि सुजाता जोशी, फॅशन आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर या महिलांचा सन्मान करण्यात आला.

चर्चासत्रात उद्योजिका रश्मी गजरा, मृण्यमी अवचट, आरती केळकर यांचा सहभाग होता. स्नेहसंमेलन कस्तुरी दवे, वृषाली काणेकर, अर्चना छाब्रिया, डॉ. अपूर्वा सावंत, राहिला गाझी, नेहा चाफेकर, सुवर्णा जाधव आणि शिखा अग्रवाल या महिला उद्योजकांच्या परिश्रमामुळे यशस्वी झाले.