Uday Kotak यांना एका झटक्यात 10 हजार कोटींचा फटका, RBI च्या कारवाईनंतर शेअरही धडाम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने या बँकेच्या सर्व ऑनलाईन सेवा, मोबाईल बँकिंग तसेच क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड सेवाही बंद केल्या आहेत. या निर्णयाचा मोठा फटका उदय कोटक यांना बसला असून शेअर बाजारा कोटक बँकेचा शेअरही धडाम झाला.

आरबीआयच्या कारवाईनंतर कोटक महिंद्रा बँकेचा शेअर 10 टक्क्यांनी खाली आला आणि 1663 रुपयांवर बंद झाला. शुक्रवारीही यात घसरण दिसून आली आणि बातमी लिहिपर्यंत या शेअरची किंमत 1622 रुपयांपर्यंत घसरली होती. याचाच अर्थ गेल्या दोन दिवसात हा शेअर 12 टक्क्यांनी घसरला आहे. यामुळे कोटक महिंद्रा बँकेचे फाऊंडर आणि नॉन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर उदय कोटक यांची संपत्तीही घटली आहे.

ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सने दिलेल्या माहितीनुसार, शेअरमध्ये झालेल्या घसरणीमुळे उदय कोटक यांना 1.3 अब्ज डॉलर अर्थात 10328 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. यामुळे त्यांची एकूण नेटवर्थ 13.1 अब्ज डॉलरवर आली आहे. याचा फटका त्यांना जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतही बसला असून ते आता 155व्या क्रमांकावर घसरले आहेत.

कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई; नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड सेवा आरबीआयने केली बंद

दरम्यान, कोटक महिंद्रा बँकेमध्ये उदय कोटक यांची 25 टक्के भागिदारी आहे. 24 एप्रिलपर्यंत त्यांची संपत्ती 14.4 अब्ज डॉलर होती. मात्र आरबीआयच्या निर्णयानंतर कोटक बँकेचा शेअर कोसळला. त्यामुळे या बँकेचे भागभांडवलही 37, 768 कोटींवरून 32,280 कोटींवर आले. त्यामुळे सर्वाधिक भागभांडवल असणाऱ्या शेअरच्या यादीत कोटक बँक 5व्या स्थानावर पोहोचली, तर एक्सिस बँक कोटक बँकेच्या पुढे गेली आहे.