मकाऊ विमानतळावरील ड्युटी-फ्री दुकानांसाठी अदानी समूह बोली लावणार

हिंदुस्थानातील बहुतांश विमानतळांचे संचालन करणाऱ्या अदानी समूहाने मकाऊमध्ये एका कंपनीची तयार केली आहे. या कंपनीद्वारे मकाऊ विमानतळावरील ड्युटी-फ्री दुकाने चालवण्यासाठी ताब्यात घेण्यासाठी बोली लावण्यात येणार आहे.

अदानी समूहातर्फे बीएसईमध्ये कागदपत्रे सादर केली आहे. या कागदपत्रांनुसार अदानी समूहाने त्यांचीच उपकंपनी असलेल्या ‘मुंबई ट्रॅव्हल रिटेल प्रायव्हेट लिमिटेड’ (एमटीआरपीएल) ने “20 नोव्हेंबर 2023 रोजी मकाऊ येथे ‘एमटीआरपीएल मकाऊ लिमिटेड’ नावाची पूर्ण मालकीची उपकंपनी समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे सांगितले आहे.

अदानी समूहाच्या या नव्या कंपनीचे उद्दीष्ट्य हे मकाऊ आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री- दारू आणि तंबाखू दुकानांसाठी बोली लावणे हे असल्याचे कळते आहे.एका इंग्रजी दैनिकाने सदर वृत्त प्रसिद्ध केले आहे.

मकाऊच्या कॅसिनोतील फोटोवरून खळबळ

आरक्षणाच्या मुद्दय़ावरून महाराष्ट्र पेटलेला असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊमधील कॅसिनोत जुगार खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. बावनकुळे यांनी अवघ्या तीन तासांत कॅसिनोत साडेतीन कोटी उडवल्याची माहिती समोर आली असून कमळाबाईच्या च्याऊ म्याऊ… मकाऊ मकाऊगिरीची पुरती पोलखोलच या फोटोने केली आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी हा फोटो ट्विट केल्यानंतर त्यावर स्पष्टीकरण देताना बावनकुळे आणि भाजप नेत्यांची भंबेरी उडाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

संजय राऊत यांनी सोमवारी एक्स अकाऊंटवर मकाऊच्या कॅसिनोतील फोटो पोस्ट केला व प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर बावनकुळे आणि भाजपकडून यावर स्पष्टीकरण देत ‘तो मी नव्हेच’ असा आव आणला गेला. त्याचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. “ते म्हणे कुटुंबासह मकाऊला गेले आहेत… जाऊ द्या. त्यांच्याबरोबर बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे… कधीच जुगार खेळले नाहीत… मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!,’’ असा इशाराच संजय राऊत यांनी दिला.

बचाव करून भाजपवाले फसले

संजय राऊत यांच्या पोस्टनंतर भाजपवाल्यांची पळापळ झाली. संजय राऊत यांनी पह्टोमधील त्या व्यक्तीच्या नावाचा कोणताही उल्लेख पोस्टमध्ये केला नव्हता, मात्र भाजप नेत्यांनी एकापाठोपाठ एक प्रतिक्रिया देत प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा बचाव सुरू केला आणि ते बावकुळेच असल्याचे शिक्कामोर्तब केले.

ते बावनकुळे नसतील तर त्यांनी सांगावे… तो मी नव्हेच!

बावनकुळेंच्या पह्टोमुळे भाजपकडून टीका होत असल्याचे माध्यमांनी सांगताच संजय राऊत म्हणाले की, ‘माझ्यावर किती लोकांनी टीका केली. आम्हीही त्या पातळीवर जाऊ शकतो, पण जात नाही. जेवढे खोटे बोलाल तेवढे फसाल. प्रत्यारोप नको उत्तर द्या. बावनकुळे त्या ठिकाणी नसतील तर त्यांनी ‘तो मी नव्हेच’ असे स्पष्ट सांगावे किंवा त्यांच्या पक्षाने सांगावे.

बावनकुळे आयुष्यात जुगार खेळले नाहीत – भाजप

प्रदेश भाजपकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयुष्यात कधीच जुगार खेळलेला नाही. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होते तेथील हा परिसर आहे, असे भाजपने म्हटले आहे.

राऊत सत्यच बोलतात-आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत यांच्या ट्विटचे जोरदार समर्थन केले. संजय राऊत जे बोलतात ते सत्य बोलतात एवढं मला माहीत आहे, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली.

भाजपचे चीन चीन चू…

मकाऊ चीनच्या अधिपत्त्याखाली आहे. भाजपवाले एका बाजूला चिनी मालावर बहिष्कार टाका म्हणतात आणि याच पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चीनमध्ये जाऊन मौजमस्ती कशी करतात, तिथे जुगारावर पैसे कसे उडवतात, असा सवाल सामान्य जनतेतून विचारला जात आहे. सोशल मीडियातूनही या पह्टोवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

बावनकुळे म्हणतात…

मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि पॅसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा पह्टो आहे, असे म्हणत बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्या आरोपाचे खंडन केले आहे.

सीबीआय चौकशी करा

महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, तरुण बेरोजगारीने त्रस्त आहे, महागाईने जनतेला जगणे कठीण झाले आहे, पण सत्ताधारी भाजपाचे नेते मात्र जुगारात व्यस्त आहेत अशी टीका करतानाच, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जुगारासाठी कोटय़वधी रुपये आले कुठून? असा सवाल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. संजय राऊत यांनी ट्विट केलेला फोटो गंभीर आहे. हा पह्टो खरा आहे का? बावनकुळे जुगार खेळत होते का? अशा प्रश्नांची सरबत्ती करताना याचा तपास झाला पाहिजे. तशीच वेळ आली तर सीबीआयमार्फत चौकशी व्हायला हवी, अशी मागणी पटोले यांनी केली.

संजय राऊत यांच्या ट्विटमुळे उडाली धांदल

ते तेच आहेत ना! 19 नोव्हेंबर… मध्यरात्री… मुक्काम ः मकाऊ, वेनेशाईन… साधारण 3.50 कोटी पॅसिनो जुगारात उडवले, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करून पहा…

27 फोटो आणि 5 व्हिडीओ…

संजय राऊत यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊच्या कॅसिनोत तीन तासांत साडेतीन कोटी रुपये उधळले. ते पैसे डॉलर्समध्ये उडवले. माझ्याकडे आणखी 27 फोटो आणि 5 व्हिडीओ आहेत. भाजपने त्यांचे सगळे नस्ते उद्योग बंद करावेत नाहीतर ते व्हिडीओही सोशल मीडियावर टाकावे लागतील. ते टाकले तर भाजपला त्यांचे दुकान बंद करावे लागेल,’ असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

मकाऊमध्ये आमची ईडी आणि सीबीआय

भाजपकडे देशात ईडी आणि सीबीआय आहे, तशी आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी, सीबीआय आहे. बावनकुळेंनी तीन तासांत साडेतीन कोटी उधळले. बाकी किती खर्च झाला याचा तपास करावा. आपण एक जबाबदार व्यक्ती आहोत, कुटुंबासोबत आहोत याचे त्यांनी भान ठेवावे, असे राऊत म्हणाले.

तेलगीने एका रात्रीत 1 कोटी उडवले हे माहिती होते. मकाऊमध्ये मात्र एक माणूस साडेतीन कोटी उडवतो म्हणजे खरेच अच्छे दिन आलेत. रेस्टॉरंटला जातात आणि साडेतीन कोटी उडवतात. साडेतीन कोटींचे तीन टप्प्यांत कॉइन विकत घेतात. मी कोणाच्या व्यक्तिगत आनंदावर विरजण घालू इच्छित नाही.