फासावर लटकवले तरी लोकशाही मरू देणार नाही, आदित्य ठाकरे यांनी सरकारला सुनावले

विधानसभा अध्यक्षांबद्दल वक्तव्य केले म्हणून शिवसेना नेते-खासदार संजय राऊत आणि माझ्याविरोधात हक्कभंग आणण्याचा विचार सरकार करत आहेत. पण हक्कभंग काय, आम्हाला फासावर लटकवले तरी आम्ही तयार आहोत. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही लोकशाही मरू देणार नाही, असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारला सुनावले.

दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर वेध संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलमधील दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा या निष्ठावान वीर मराठा योद्धय़ांची चित्रमय यशोगाथा आणि शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी त्यांनी मिंधे सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मिंधे गटाने राज्यघटनेतील शेडय़ुल 10 चे उल्लंघन केल्याबद्दल शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयानेही शेडय़ुल 10 वर निकाल द्यावा असे आदेश दिले होते, मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्यावर निर्णय न देता दुसराच निर्णय दिला. हा एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी शिवसेना सचिव आणि वेध संस्थेचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे, उपनेते सचिन अहिर, विभागप्रमुख महेश सावंत, उपनेत्या विशाखा राऊत, महिला संघटक श्रद्धा जाधव आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन, प्रदर्शनात पहा मराठा योद्धय़ांची मूळ चित्रे

माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे स्मृतिस्थळाजवळ ऐतिहासिक शस्त्रांची जपणूक करणाऱया किरण शिंदे यांच्या ‘दगडांच्या देशा प्रतिष्ठान’च्या वतीने सुरू असलेल्या चित्रप्रदर्शनात मराठा योद्धय़ांची मूळ चित्रे लावण्यात आली आहेत. यात महाराष्ट्र निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमंत थोरले शाहू छत्रपती, महाराणी ताराराणी साहेब, छत्रपती राजाराम महाराज, अजिंक्य योद्धा पेशवा बाजीराव पहिला, पिलाजी जाधवराव, अंताजी मानकेश्वर गंधे, महावीर महादजी शिंदे, यशवंतराव होळकर, कृष्णाजी पवार, वीर दत्ताजी शिंदे, वीर सरदार मानाजी पायगुडे, सुभेदार मल्हारराव होळकर, सदाशिवभाऊ पेशवे यांची मूळ चित्रे पाहता येणार आहेत. दरम्यान, दादरच्या वनिता समाज सभागृह आणि परिसरात मुंबईकरांना आणि कलाप्रेमींना भुरळ घालणारा छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल 14 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

हे प्रदर्शन मंत्रालयासमोर लाका

आतापर्यंत दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, अशी मराठी माणसाची आजपर्यंत शान राहिली होती. मात्र, मिंधे सरकारने गुलामी पत्करुन ही शान धुळीला मिळकली. हे प्रदर्शन खरे तर मंत्रालयासमोर लाकण्याची खरी गरज आहे. हे सरकार आता फार काळ टिकणार नाही आणि टिकलेच तर मंत्रालय सूरत किंका अहमदाबादला घेऊन जातील, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगाकला.

रणमार्तंड शिवशंभू शाहिरी पथकाचा दणकेबाज पोवाडा

ठाण्याचे शाहीर प्रवीण फणसे यांच्या रणमार्तंड शिवशंभू शाहिरी पथकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा आणि अफजल खान वधाचा पोवाडा पहाडी आवाजात सादर केला. त्याचबरोबर जिजाऊ, सावित्री, रमाई मातेसह महाराष्ट्र गीत सादर केले. त्याला त्यांची 13 वर्षांची मुलगी शर्वरी, 7 वर्षांचा मुलगा बालशाहीर वीर आणि पत्नीने साथ दिली.